शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 01:33 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनांच्या वतीने द्वारका चौकात गुरुवारी (दि. १७) निदर्शने करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

ठळक मुद्देआक्रोश आंदोलन : समता परिषदेसह ओबीसी संघटनांचा सहभाग

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मुद्यांवर केंद्र सरकारविरोधात महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनांच्या वतीने द्वारका चौकात गुरुवारी (दि. १७) निदर्शने करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण देण्यात यावे, त्यांची जनगणना करण्यात यावी, यासह विविध न्याय्य मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या. आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या हातात असून शासनाने या प्रश्नाकडे लक्ष घालावे. ओबीसींच्या मागण्यांबाबत सुरू केलेली ही रस्त्यावरची लढाई ओबीसींच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरू राहील, असे दिलीप खैरे यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांना अटक करण्यात येऊन काहीवेळाने  त्त्यांची सुटका करण्यात आली.  आंदोलनात   बाळासाहेब कर्डक, संतोष सोनपसारे, समाधान जेजूरकर,  संतोष गायकवाड, समीना मेमन, लक्ष्मण जायभावे, तानाजी जायभावे, कविता कर्डक, रंजना पवार, सदाशिव माळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.घोषणांनी परिसर दणाणलाओबीसींचे राजकीय आरक्षण वाचलेच पाहिजे, ऊठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, न्याय नाही हक्क आहे, आरक्षण ओबीसींचे पक्के आहे, ओबीसी आरक्षणाचा हक्काचा वाटा, केंद्र सरकार लवकर द्या इंपेरिकल डाटा,  ओबीसींच्या आरक्षणाला जाऊ देऊ नका तडा, ओबीसी आक्रोश आता देशव्यापी लढा... अशा घाेषणा देऊन आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता.

टॅग्स :NashikनाशिकOBC Reservationओबीसी आरक्षणagitationआंदोलन