शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भूजल अधिनियमनाविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:45 IST

शेतकऱ्यांना आता आपल्या शेतात कोणत्या पिकाची लागवड करायची हे शासनाच्या धोरणानुसार ठरवावे लागणार असून विहीर, विंधनविहीर खोदण्यासाठीही शासनाची परवानगी घेत पाण्याचा महसूलही भरावा लागणार असून, याबाबत शासनाने नव्याने भूजल अधिनियमन आणले आहेत.

दिंडोरी : शेतकऱ्यांना आता आपल्या शेतात कोणत्या पिकाची लागवड करायची हे शासनाच्या धोरणानुसार ठरवावे लागणार असून विहीर, विंधनविहीर खोदण्यासाठीही शासनाची परवानगी घेत पाण्याचा महसूलही भरावा लागणार असून, याबाबत शासनाने नव्याने भूजल अधिनियमन आणले आहेत. या निर्णयास शेतकºयांनी विरोध करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत हरकती नोंदवण्यात येऊन वेळप्रसंगी आंदोलन व न्यायालयात जाण्याचा निर्णय दिंडोरी येथे झालेल्या सर्वपक्षीय शेतकºयांच्या बैठकीत घेण्यात आला. कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, वाघाड महासंघाचे चंद्रकांत राजे, शहाजी सोमवंशी, शिवाजी पिंगळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी दिगवंत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.शासनाच्या भूजल व धरण पाणीवाटप नियोजन जलआराखडा याबाबत आमदार नरहरी झिरवाळ यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत मुद्दा उपस्थित करत लक्ष वेधले होते. या प्रश्नावर आमदार झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.शासनाने भूजल अधिनियम प्रसिद्ध केले असून त्यात शेतकºयांना विहीर व विंधनविहीर खोदण्यास परवानगी घ्यावी लागणार आह. तसेच या पाणी वापरासाठी कर भरावा लागणार आहे. कोणत्या क्षेत्रात किती पाणी उपलब्ध होणार आहे यावर तेथे कोणती पिके घ्यायची हे शासन ठरवून देणार आहे. अधिसूचित पिके सोडून दुसरे पीक लावायचे असेल तर त्याची परवानगी घ्यावी लागणार असून, त्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. आदी विविध बाबी या अधिनियमनात प्रस्तावित असून, यावर ३१ आॅगस्ट पर्यंत हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत. याबाबत दिंडोरीत बैठक झाली, यावेळी शेतकºयांनी या कायद्याला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी एकत्रित हरकती घेण्यात येणार आहे.धरणांच्या जलनियोजनाबाबत नाराजीजायकवाडी धरण भरावे यासाठी ऊर्ध्व गोदावरी खोºयात पाणी अडवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यावर नाराजी व्यक्त केली असून हे निर्बंध उठविण्याची मागणी करण्यात आली. दिंडोरी तालुक्यात घाटमाथ्यावर अजूनही साइट उपलब्ध आहे तेथे गुजरातला वाया जाणारे पाणी गोदावरी खोºयात वळवून तूट भरून काढणे शक्य असून, त्यासाठी शासनाने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. शेतकºयांनीही जागरूक होत सर्व धरणे लाभक्षेत्रात पाणी वाटप सोसायटी स्थापन करून पाणी परवानगी घेऊन आपला कायदेशीर पाण्यावरील हक्क प्रस्थापित करावा असे ठरविण्यात आले.यावेळी कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, वाघाड महासंघाचे चंद्रकांत राजे, शहाजी सोमवंशी, शिवाजी पिंगळ, कोपरगाव साखर कारखान्याचे संचालक सोमनाथ पाटील चांदगुडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, विश्वासराव देशमुख, आर. के. खांदवे, गोपीनाथ गांगुर्डे, बाळासाहेब कदम, जे.डी. केदार, मनोज ढिकले, नितीन गांगुर्डे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नरेश देशमुख यांनी केले. यावेळी सुरेश डोखळे, संजय पडोळ, बाळासाहेब जाधव, राजेंद्र ढगे, भास्कर भगरे, सुरेश देशमुख, सदाशिव गावित, संजय वाघ, राजेंद्र देशमुख, दिनकर जाधव, वाळू जगताप, रणजित देशमुख, गंगाधर निखाडे, विलास कड, रघुनाथ गामणे, डॉ. योगेश गोसावी, पांडुरंग गणोरे, सुनील आव्हाड, प्रकाश पिंगळ, श्याम हिरे, पप्पू राऊत आदी उपस्थित होते.

टॅग्स :GovernmentसरकारWaterपाणी