शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकरा वर्षांनी वाजली शाळेची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:41 IST

गंगापूररोडवरील मविप्र विद्यालयात २००६-०७ या इयत्ता दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी (दि.१०) शाळेचे मुख्याध्यापक अरु ण पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तब्बल अकरा वर्षांनी दहावीच्या वर्गातील शेकडो विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. या स्नेहमेळाव्याला पाऊलखुणा असे नाव देण्यात आले होते.

पंचवटी : गंगापूररोडवरील मविप्र विद्यालयात २००६-०७ या इयत्ता दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी (दि.१०) शाळेचे मुख्याध्यापक अरु ण पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तब्बल अकरा वर्षांनी दहावीच्या वर्गातील शेकडो विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. या स्नेहमेळाव्याला पाऊलखुणा असे नाव देण्यात आले होते.स्नेह व माजी विद्यार्थी मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून मविप्र क्र ीडा अध्यक्ष हेमंत पाटील, माजी मुख्याध्यापक एन. एम. ठोके, एस. टी. अत्रे, ए. एम. पवार, श्रीमती एम. आर. खैरनार, एस. एच. दरेकर, एस. एस. आडके आदी उपस्थित होते. मेळाव्याचे आयोजन संजय शिंदे, वैभव विधाते, राहुल ढगे, प्रवीण पाटील, राम केदार, सोनू चौधरी, उमेश शिंदे, राहुल तपकिरे आदींनी केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत सध्या विद्यार्थी काय करतात, त्यांचा व्यवसाय काय याबाबत माहिती जाणून घेत शाळेतील एक ना अनेक गमतीदार किस्से सांगून सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच त्यांना भेटवस्तू व सन्मानचिन्ह देण्यात आले. मेळाव्याला दहावीच्या बॅचमधील दीडशे विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन माधुरी जोशी यांनी केले.मेळाव्याला मोनू चौधरी, स्वप्नील चव्हाणके, मयूर वरघडे, अक्षय शिंदे, विजय धुमाळ, योगेश मौले, तेजस्विनी वाढणे, स्नेहा चव्हाण, प्रणित वाघ, कुणाल भवर आदींसह उपस्थित होते.वर्गखोली डिजिटल करणारतब्बल ११ वर्षांनी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षण घेतल्याची आठवण म्हणून एक वर्गखोली डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात विद्यार्थी वर्गणी जमा करून शाळेची एक खोली डिजिटल करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे स्नेहमेळाव्यास स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी