शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अकरा हजार उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 01:43 IST

नाशिक जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेतल्यानंतर  निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ५८९५ जागांसाठी आता ११ हजार १०५ इतके उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

ठळक मुद्देग्रामपंचायत:  १६२७ उमेदवार आले बिनविराेध

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेतल्यानंतर  निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ५८९५ जागांसाठी आता ११ हजार १०५ इतके उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. दरम्यान, बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या १६२७ इतकी असून, सर्वाधिक २३८ उमेदवार  सिन्नर तालुक्यातून बिनविरोध निवडून आले आहेत. गेल्या ४ जानेवारी  रोजी अर्ज माघारी झाल्यानंतर निवडणूक रिंगणातील चित्र समोर आले होते; परंतु नांदगाव आणि येवला तालुक्यांमधील अर्ज माघारीचे नाट्य लांबल्यामुळे या दोन्ही तालुक्यांमधील अंतिम आकडेवारी समोर आलेली नव्हती.  निवडणुका असलेल्या १३ तालुक्यांमधील ५८९५ जागांसाठीचे चित्र  आता स्पष्ट झाले असून, ११,१०५ उमेदवार नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातील ५८९५ जागांसाठी १६,५६३  असे इतके नामनिर्देशन अर्ज वैध ठरल्याने  अर्ज माघारीसाठी उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी राजकीय नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागली. माघारीच्या दिवशी प्रत्येक तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज माघारीची मुदत असल्याने उमेदवारांना  धावपळ करावी लागली. शंभरावर उमेदवार बिनविरोधनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय पातळीवर व्यापक हालचाली सुरू असल्यामुळे त्याचा परिणामही दिसून आला. अनेक तालुक्यांमध्ये शंभरच्या पुढे जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. निफाड, सिन्नर, येवला, मालेगाव आणि नांदगाव तालुक्यांमधून अर्ज माघार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. जवळपास सर्वच ठिकाणी अर्ज माघारी घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचेही दिसून आले. 

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत