शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

प्राथमिक शिक्षकांना निवृत्तिवेतन मिळण्यास दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 23:21 IST

देवळा : मागील वर्षभरापासून तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना दिरंगाईने निवृत्तिवेतन मिळत असल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवृत्तिवेतन वेळेवर मिळावे अन्यथा बँकांच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देवळा तालुका पेन्शनर असोसिएशनच्या वतीने तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

ठळक मुद्देबँकांच्या दिरंगाईमुळे औषधांसाठी वेळेवर पैसे उपलब्ध न झाल्याने हात उसनवारी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : मागील वर्षभरापासून तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना दिरंगाईने निवृत्तिवेतन मिळत असल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवृत्तिवेतन वेळेवर मिळावे अन्यथा बँकांच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देवळा तालुका पेन्शनर असोसिएशनच्या वतीने तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.देवळा तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे देना बँकेत खाते आहे. पंचायत समितीचे अनुदानाचे खाते हे स्टेट बँकेत आहे. निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतनाचे अनुदान पंचायत समितीच्या खात्यात वर्ग झाल्यानंतर या अनुदानाचा धनादेश स्टेट बँकेत जमा केला जातो. मात्र स्टेट बँकेतून सवडीने सर्वच्या सर्व रक्कम ही देना बँकेकडे वर्ग केली जाते. देना बँकेचे कर्मचारी निवृत्तिवेतनधारकांच्या खात्यात पैसे वर्ग करण्यासाठी आठ ते दहा दिवसाचा कालावधी लावतात. त्यामुळे निवृत्तिवेतनधारकांना दीड ते दोन महिना उशिरा मिळते. सर्वच सेवानिवृत्त कर्मचारी हे वयोवृद्ध आहेत. पेन्शन जमा झाली किंवा नाही याची विचारणा करण्यासाठी त्यांना बँकेचे अनेक हेलपाटे मारावे लागतात. तसेच वयोमानाप्रमाणे येणारे हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यासारख्या गंभीर आजारांचा सामना करण्यासाठी औषधोपचाराचा मोठा खर्च त्यांना पेन्शनमधून करावा लागतो. बँकांच्या दिरंगाईमुळे औषधांसाठी वेळेवर पैसे उपलब्ध न झाल्याने हात उसनवारी करावी लागते.या सर्वातून मार्ग काढण्यासाठी बँकांनी आॅनलाइन पद्धतीने आरटीजीएसद्वारे शिक्षकांचे पेन्शन त्यांच्या खात्यात वर्ग करून वेळेचा अपव्यय टाळावा व लवकरात लवकर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवृत्तिवेतन अदा करावे अन्यथा निवृत्तिवेतनधारकांसह बँकेच्या दारात धरणे आंदोलन करण्याचा इशारा देवळा तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे किसन निकम, बी.टी. आहिरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिला आहे. तहसीलदार शेजूळ यांना निवेदन देण्यात आले आहे.यावेळी सोमनाथ मुसळे, भाऊराव अहिरे, जिभाऊ गुंजाळ, नंदकुमार खरोटे, बाळकृष्ण चव्हाण, नारायण रणधीर, निंबा आहेर, सुलोचना थोरात, धर्माजी पाटील यांच्यासह निवृत्तिवेतनधारक उपस्थित होते.राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या देवळा तालुका ग्राहक पंचायतीच्या बैठकीत तालुक्यातील पेन्शनधारकांना वेळेवर पेन्शन मिळत नसल्याची तक्र ार करण्यात आली होती. पंचायत समितीकडून होणारी दिरंगाई व बँकेकडून होणारी अडवणूक तसेच त्यांच्यात असलेला समन्वयाचा अभाव याचा त्रास आम्हाला भोगावा लागतो.- निंबाजी आहेर, सेवानिवृत शिक्षक, देवळापंचायत समितीचे गटविकास अधिकारी, देना बँकेचे व स्टेट बँकेचे व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधून योग्य उपायोजना करण्याचे आदेश दिले आहेत. पेन्शन दिरंगाईस कारणीभूत असलेल्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर करून निवृत्तिवेतन वेळेवर दिले जाईल.- दत्तात्रय शेजूळ, तहसीलदार, देवळा

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक