शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

पोळवाड्याच्या तिसऱ्या मजल्यावर इलेक्ट्रॉनिक गिझरला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:20 IST

सराफ बाजारातील बालाजी कोट परिसरातील एका तीन मजली जुन्या वाड्यातील पोळवाड्याच्या तिसऱ्या मजल्यावर अचानकपणे आग लागली. पाण्याच्या बादलीत सोडलेल्या हिटरकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पाणी प्रचंड तापले आणि बादलीतून बाहेर पडले यावेळी हिटरही जमिनीवर पडल्याने घरातील काही कपड्यांसह पुस्तकांनी पेट घेतला. धूर निघत असल्याचे परिसरातील युवकांच्या तत्काळ लक्षात आल्याने अनर्थ टळला.

नाशिक : सराफ बाजारातील बालाजी कोट परिसरातील एका तीन मजली जुन्या वाड्यातील पोळवाड्याच्या तिसऱ्या मजल्यावर अचानकपणे आग लागली. पाण्याच्या बादलीत सोडलेल्या हिटरकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पाणी प्रचंड तापले आणि बादलीतून बाहेर पडले यावेळी हिटरही जमिनीवर पडल्याने घरातील काही कपड्यांसह पुस्तकांनी पेट घेतला. धूर निघत असल्याचे परिसरातील युवकांच्या तत्काळ लक्षात आल्याने अनर्थ टळला.  याबाबत अग्निशामक दलाकडून मिळालेली माहिती अशी, सराफ बाजारामागे सरस्वती चौकात असलेल्या पोळवाड्याच्या वरच्या मजल्यावरील खोलीमधून अचानकपणे मंगळवारी दुपारच्या सुमारास धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे परिसरातील रहिवाशांसह युवकांच्या लक्षात आले. घटनेची माहिती काही जागरूक नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला कळविली.  अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचेपर्यंत युवकांनी खोलीत धाव घेऊन सुखरूपपणे वयोवृद्ध नलिनी पोळ यांना खाली आणले आणि पाण्याच्या बादल्यांच्या सहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली. अग्निशामक दलाचा बंब जुने नाशिकमार्गे भद्रकालीतून सराफ बाजारात पोहचला; मात्र सरस्वती चौकाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्यामुळे दोन्ही बंब अडकले. आग लागलेल्या वाड्यापर्यंत बंब घेऊन जाणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर जवानांनी खाली उतरुन पाण्याचा होज ओढत वाड्याकडे नेला आणि पाण्याचा मारा सुरू केला. तापेर्यंत युवकांनी बादल्यांनी पाणी फेकून आग अधिक वाढू दिली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.प्रसंगावधानजवानांनी घरात जाऊन गॅस सिलिंडर बाहेर काढला. सिलिंडरही पुर्णपणे काळा झाला होता. आग लवकर विझल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली नाही. लाकडी वाडा असल्यामुळे आणि अरुंद गल्लीबोळाचे आव्हान मदतकार्यापुढे होते; मात्र सुदैवाने आगीने रौद्रावतार धारण केला नाही, त्यामुळे मोठे संकट टळले.

टॅग्स :Fairजत्रा