शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

वीजदरवाढ, बिलांविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:48 IST

वीजदरवाढ मागे घ्या, भरमसाट वाढीव बिले रद्द करा, आघाडी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत नाशिक महानगर भाजपच्या वतीने तिबेटियन मार्केटच्या महावितरण उपविभागीय कार्यालयाबाहेर शहर भाजपच्या वतीने आंदोलन करून वीज बिलांची होळी करण्यात आली.

ठळक मुद्देझटका : भाजपच्या वतीने घोषणा; तिबेटियन मार्केटमधील उपकेंद्रासमोर केली वीज बिलांची होळी

नाशिक : वीजदरवाढ मागे घ्या, भरमसाट वाढीव बिले रद्द करा, आघाडी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत नाशिक महानगर भाजपच्या वतीने तिबेटियन मार्केटच्या महावितरण उपविभागीय कार्यालयाबाहेर शहर भाजपच्या वतीने आंदोलन करून वीज बिलांची होळी करण्यात आली. आंदोलनानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणीदेखील करण्यात आली.राज्य शासनाच्या महावितरण विभागाने एप्रिलपासून वीज बिलांमध्ये अचानकपणे केलेली दरवाढ आणि नागरिकांना अवाजवी बिलांचे वितरण करीत सामान्य नागरिकांना विजेचा धक्काच दिल्याच्या निषेधार्थ महानगरातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. एप्रिलपासून वाढवण्यात आलेले वीज बिलांची दरवाढ मागे घेण्यात यावी. ही दरवाढ पूर्णपणे रद्द करण्यासह ३०० युनिटपर्यंतची वीज बिले माफ करण्यात यावी, अशी मागणीदेखील निवेदनाद्वारे करण्यात आली. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये संपूर्ण राज्यातील विद्युत वितरण कंपन्यांसाठी ९० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर केलेले आहे. त्यातील तीन हजार कोटी रुपये राज्य शासनाच्या वितरण कंपन्यांकडे जमा झाले आहेत, त्यामुळे अवाजवी दरवाढ आणि भरमसाट बिले त्वरित रद्द करण्यात यावी, अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या आंदोलनप्रसंगी नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, रोहिणी नायडू, शिवाजी गांगुर्डे, सुरेश पाटील, योगेश हिरे, देवदत्त जोशी, प्रशांत जाधव, पवन भगूरकर, स्वाती भामरे, अनिल जाधव, विलास देवळे, धनंजय पुरोहित, दिनेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकBJPभाजपाelectricityवीज