शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरणने दिला बिलवाढीचा शॉक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:01 IST

विंचूरदळवी येथे गत महिन्यात एका ग्राहकाने वीजबिल भरलेले असताना व अनावश्यक वापर नसतानाही जुलै महिन्यात त्यास चक्क लाखाचे बिल आल्याने परिसरातील ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे.

सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी येथे गत महिन्यात एका ग्राहकाने वीजबिल भरलेले असताना व अनावश्यक वापर नसतानाही जुलै महिन्यात त्यास चक्क लाखाचे बिल आल्याने परिसरातील ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे. याबाबत महाराष्टÑ क्रांती सेनेच्या वतीने महावितरणाच्या पांढुर्ली येथील सहायक उपअभियंत्यांना निवेदन देऊन याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.विंचूरदळवी येथील गोरख साहेबराव शेटे या ग्रामस्थास फेबु्रवारी महिन्यात ३२० रुपये वीजबिल आले होते. नंतर जुलै महिन्यात एक लाख ५ हजार ७५० रुपये इतके बिल महावितरणाकडून देण्यात आले. तसेच भरत वाकचौरे, सखाराम रोहिमल, महिंद्र साबळे, बाळा बर्वे, महम्मद मसूर, महम्मद सुबान अन्सारी, राजेंद्र रोहिमल, रखुबाई येडे, सुनीता हिवाळे, विजय कोकणे, विंचूरदळवीसह परिसरातीत घोरवड, आगसखिंड, पांढुर्ली, बोरखिंड परिसरातील वीजग्राहकांना गेल्या सहा महिन्यांपासून वाढीव वीजबिले येत आहेत.निवेदनावर महाराष्टÑ क्रांती सेनेचे तालुकाध्यक्ष गोपाल गायकर, उपाध्यक्ष कैलास दातीर, चंद्रकांत डावरे, संजय तुपे, भाऊसाहेब पिंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.वीज वितरण कंपनीकडे याबाबत तक्रार केली असून, बिल ठेकेदार यांनी सदर मीटर बदलण्यासाठी आमच्याकडून दहा हजार रुपयेघेतले. पावती नंतर मिळेल असे सांगून नंतर ती देण्यास टाळाटाळ केली. परिसरात इतरही ग्राहकांना अशीच वाढीव बिले, वारंवार मीटर बदलण्यास सांगणे कोणत्याही कारणाने पैसे घेणे असे प्रकार वारंवार घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज