राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील ग्रामपंचायत व वीज वितरण कंपनीच्या वादात येथील चौफुलीवरील पथदीप बंद पडले आहे.पथदीपावरील पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरण्याची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याने वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सदर पोलवरील कनेक्शन काढून टाकले. त्यामुळे पथदीप सध्यातरी बंद झाला आहे.ग्रामपंचायत म्हणते वीज वितरण कंपनी काम करेल वीज वितरण कंपनीचे कर्मचारी म्हणतात ग्रामपंचायत काम करेल या दोघांच्या वादात राजापूर चौफुलीवरील पथदीप बंद झाला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.छोट्या कामाची कोणी दखल घेत नाही ती खरी बाब आहे. लाखो रु पये खर्च करून शोभेच्या वस्तू गावात आणल्या जातात मात्र ज्यांची जबाबदारी आहे. ते सांभाळत नाही हे वाईट आहे. गेल्या एक महिन्यापासून या पथदीपामध्ये वीज प्रवाह उतरला होता. आता हा पथदीप कोण दुरु स्त करेल याकडे गावचे लक्ष लागले आहे.
वीज कंपनी- ग्रामपंचायतीच्या वादामुळे राजापूर चौफुलीवरील विद्युत पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 17:34 IST
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील ग्रामपंचायत व वीज वितरण कंपनीच्या वादात येथील चौफुलीवरील पथदीप बंद पडले आहे.
वीज कंपनी- ग्रामपंचायतीच्या वादामुळे राजापूर चौफुलीवरील विद्युत पुरवठा बंद
ठळक मुद्देवीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सदर पोलवरील कनेक्शन काढून टाकले