शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक अमरधाममध्ये विद्युत शवदाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:37 IST

महापालिकेच्या वतीने पर्यावरणास चालना देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक अमरधाममध्ये विद्युत दाहिनी उभारण्यात आली आहे.

नाशिक : महापालिकेच्या वतीने पर्यावरणास चालना देण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक अमरधाममध्ये विद्युत दाहिनी उभारण्यात आली आहे. मात्र ती कार्यान्वित असूनही कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, पंचवटी अमरधाममध्ये सध्या नादुरुस्त असलेली डिझेल शवदाहिनी पंचवटी अमरधाममध्ये स्थलांतरित करण्यात येत असून, तेथे डिझेल ऐवजी गॅसवर ती चालविण्यात येणार आहे.महापालिकेच्या वतीने शहरात सुमारे अकरा स्मशानभूमी असून नाशिक व पंचवटी अमरधाम सर्वांत मोठे आहे. त्या खालोखाल देवळाली अमरधामवर ताण असतो. नाशिक अमरधाममध्ये सुमारे दहा वर्षांपूर्वी डिझेल शवदाहिनी उभारण्यात आली. अंत्यसंस्कारासाठी लागणारा लाकूड फाटा वाचावा व यानिमित्ताने वृक्षतोड टळावी हा त्यानिमित्ताने उद्देश असला तरी लोकांमध्ये सुरुवातीला प्रबोधन नव्हते. नंतर मात्र प्रतिसाद वाढला. सध्या महिन्या काठी सुमारे वीस ते पंचवीस अंत्यसंस्कार डिझेल दाहिनीत केले जातात. त्यातील पंधरापेक्षा अधिक बेवारस मृतदेह असतात.  अर्थात, ही डिझेल दाहिनी नादुरुस्त मोठ्या प्रमाणात असते. त्यातच ठाणे येथील एकमेव ठेकेदार तो दुरुस्त करीत असतो. गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनी स्थापन केल्यानंतर त्या अंतर्गत नाशिक अमरधाममध्ये विद्युत शवदाहिनी सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. मध्यंतरी स्मार्ट सिटी कंपनीनेदेखील प्रत्यक्ष पाहणी केली होती.नाशिक अमरधाममध्ये त्यानुसार विशेष शेड बांधून विद्युत दाहिनी उभारण्यात आली आहे. मात्र ती अद्याप कार्यान्वित करण्यात आलेली नाही दुसरीकडे नादुरुस्त डिझेल दाहिनी आता पंचवटी अमरधाममध्ये पाठवून ती गॅसवर कार्यान्वित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक