शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी पिकांना विजेचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 14:25 IST

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असताना गेल्या दोन ते तीन दिवसापासून वारंवार विजपुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहेत.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरात रब्बी हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असताना गेल्या दोन ते तीन दिवसापासून वारंवार विजपुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहेत. भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी शिवारात गेल्या काही दिवसापासून वीज गायब असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर्षी अपेक्षित पाऊस झाल्याने रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी चांगल्या प्रमाणात पिके घेतली आहेत. काही शेतकºयांच्या शेतात पाणी भरण्याच्या आत वीज गायब होत आहे. सध्या तापमानात वाढ झाल्याने रब्बीच्या पिकांना पाण्याची नितांत गरज असतानाच वीज वितरण कंपनीकडून विज पुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा फटका नगदी पिकांना बसत आहेत. त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. नांदूरशिंगोटे, दापूर, चास आदी भागात शनिवारी (दि.१) ला ९ तास वीज पुरवठा खंडीत होता. तर रविवारी सकाळी ९ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत वीज गायब होती. तसेच नळवाडी गावाला नांदूरशिंगोटे व चास येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जात आहे. परंतु गेल्या चार दिवसापासून या भागात केव्हाही वीज गायब होेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नळवाडी गावातील काही भागात सोनेवाडी भागातील वीजेची लाईन जोडल्याने या ंिठकाणी वीजपुरवठा करण्यात अडचणी येत असल्याचा आरोप नळवाडी ग्रामस्थांनी केला आहे. नळवाडी शिवारात २४ रोहित्र असून त्यापैकी ११ रोहित्र दुसरीकडे जोडण्याची मागणी तेथील शेतकºयांनी केली आहे. वीज पुरवठा खंडीत असल्याने येथील शेतक-यांनी नांदूरशिंगोटे कार्यालयात धाव घेवून आपले गाºहाणे मांडले. यावेळी माजी उपसरपंच सुदाम दराडे, दत्तात्रय दराडे, नितीन दराडे, निवृत्ती सानप, भागवत सहाणे, भाऊसाहेब दराडे, भारत दराडे, मच्छींद्र दराडे, बाळासाहेब दराडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.--------------चौकट- भोजापूर खोरे परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहेत. विजेचा लंपडाव सुरू असल्याने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्याकरिता जाणाºया शेतक-यांमध्ये गीतीचे वातावरण तयार झाले आहे. नळवाडी शिवारात दिवसा कमी दाबाने विजपुरवठा होत असल्याने विजपंप सुरळीत चालत नाही. त्यामुळे त्याचा फटका रब्बी पिकांना बसत आहे.-सुदाम दराडे, माजी उपसरपंच, नळवाडी---------------------शनिवारी सिन्नरहून नांदूरशिंगोटे येणाºया विजवाहिनीच्या मुख्य वीजवाहक तारा तुटल्याने तसेच रविवारी सकाळी वीजेचा लोड वाढल्याने विज पुरवठा खंडीत झाला होता. रविवारी दुपारनतंर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. विजेचा दाब वाढू नये यासाठी प्रत्येक फिडर वाईज नियोजन करण्यात आले आहे.-आर. एस. भगत, सहाय्यक अभियंता.

टॅग्स :Nashikनाशिक