शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

शहर बस वाहतुकीसाठी अखेर इलेक्ट्रिक बसची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 01:11 IST

शहरात बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेला निविदांचा प्रतिसाद मिळू लागला असून, शुक्रवारी (दि.१६) एका कंपनीच्या इलेक्ट्रिकल बसची चाचणी घेण्यास प्रारंभ केला. महापौर रंजना भानसी तसेच अन्य अधिकारीदेखील यात सहभागी झाले होते.

नाशिक : शहरात बससेवा सुरू करण्यासाठी महापालिकेला निविदांचा प्रतिसाद मिळू लागला असून, शुक्रवारी (दि.१६) एका कंपनीच्या इलेक्ट्रिकल बसची चाचणी घेण्यास प्रारंभ केला. महापौर रंजना भानसी तसेच अन्य अधिकारीदेखील यात सहभागी झाले होते. दोन दिवस सदरची चाचणी असून, तांत्रिक तपासणीत योग्य ठरल्यासच या कंपनीच्या आर्थिक देकारची पुढील तपासणी होणार आहे.महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक चालविण्याचा ठराव करण्यात आल्यानंतरदेखील प्रशासकीय पातळीवर बससेवेसाठी प्रतिसाद मिळत नव्हता. महापालिकेच्या वतीने दीडशे इलेक्ट्रिकच्या बस वापरण्यात येणार असून, पन्नास डिझेल, तर दोनशे सीएनजी बस असतील. यासंदर्भात निविदापूर्व बैठकीस अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहत असले तरी प्रत्यक्षात निविदा मात्र भरल्या जात नव्हत्या. इलेक्ट्रिक बससाठी तीनवेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र तिन्हीवेळेस एकाच कंपनीने निविदा भरली होती. त्यामुळे इवे या कंपनीची तांत्रिक बिड उघडण्यात आले आणि त्यात नमूद केलेल्या पात्रतेनुसार या बस आहेत किंवा नाही त्याची तपासणी करण्यात आली.महापालिकेने बससेवेच्या तांत्रिक तपासणीसाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून, त्यात मनपाचे लेखापाल, लेखापरीक्षक, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता तसेच परिवहन महामंडळाचे व्यवस्थापक, स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ अशा अधिकाऱ्यांचा समावेश आहे.या समितीने शुक्रवारी बसमध्ये बसूनही क्षमता तपासली. त्याचवेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती उद्धव निमसे, सभागृह नेते सतीश सोनवणे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांनी रामायण ते सातपूर आणि तेथून राजीव गांधी भवन या मार्गावरून सफर केली.मनपाने सीएनजी आणि डिझेलसाठी मागवलेल्या निविदांनादेखील प्रतिसाद मिळाला असून, तीन निविदा प्राप्त झाल्याने आता त्यादेखील पुढील आठवड्यात उघडल्या जाणार आहेत. त्यामुळे मनपाच्या बसची डबल बेल लवकरच वाजेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.महापालिकेच्या वतीने शनिवारी (दि.१७) तपासणीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर आर्थिक देकार तपासला जाणार आहे. महापालिकेने प्रति किलोमीटर प्रवासी वाहतूकीचे दर मागितले असून, ते किती सादर होतात, यावर पुढील निविदेचा निर्णय होणार आहे.दरम्यान शहर बस वाहतुकीसाठी असलेल्या इलेक्ट्रिक बसची क्षमता ३८ प्रवासी व एक चालक अशी आहे. बसमध्ये दोन बॅटरी असून, त्याचा वेग माफक असेल. परंतु शहर बस असल्याने सामान वाहण्यासाठी अतिरिक्त जागा असणार नाही. अन्य बसच्या तुलनेत बस वाहतुकीची क्षमता कमीच असेल. सध्या हैदराबाद येथे या कंपनीची बससेवा सुरू आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad transportरस्ते वाहतूक