शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सत्तास्थाने नसताना जिंकली निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 01:50 IST

शिवसेनेकडून मी उमेदवारी करावी, असा आग्रह शिवसैनिकांकडून करण्यात आला. माझी आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने निवडणुकीचा खर्च शिवसैनिकांनी करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेकडून विधानसभेची माझी उमेदवारी निश्चित झाली.

म नमाड पालिकेचे नगरसेवक पद व शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत असताना १९९५च्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. त्यावेळी तालुक्यात मनमाड नगरपालिकेमध्ये शिवसेनेचे पाच नगरसेवक व पंचायत समितीचे विजय सांबरे हे एकमेव सदस्य ही सत्तास्थाने वगळता सर्वत्र कॉँग्रेसचे वर्चस्व होते. शिवसेनेकडून मी उमेदवारी करावी, असा आग्रह शिवसैनिकांकडून करण्यात आला. माझी आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने निवडणुकीचा खर्च शिवसैनिकांनी करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेकडून विधानसभेची माझी उमेदवारी निश्चित झाली. प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये कॉ. माधवराव गायकवाड व जगन्नाथ धात्रक हे दोन माजी आमदार माझ्या विरोधात उभे होते. त्यांच्यासह अपक्ष म्हणून रोडू अण्णा पाटील हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात होते. दोन्ही प्रबळ व बलाढ्य उमेदवारांपुढे आपल्यासारख्या सर्वसामान्य आणि नवख्या उमेदवाराचा टिकाव कसा लागणार असा प्रश्न समोर उभा होता. मात्र जनतेचा शिवसेनेवरील विश्वास व कार्यकर्त्यांचे पाठबळ यामुळे निवडणूक सोपी झाली. कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून प्रचारासाठी भाड्याने एक गाडी घेऊन दिली. त्या गाडीतून तालुक्यातील ग्रामीण भागातील गावे, वाडे, वस्त्या पिंजून काढल्या. प्रचारासाठी मतदारांची भेट घेण्यासाठी गेल्यावर अनेक मतदारांकडून शुभेच्छा म्हणून हार व नारळ दिले जायचे. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी तालुक्याला परिचित असल्याने लोकांनी पुढे हार व नारळ देण्याऐवजी पैशांच्या रूपात मदत देणे सुरू केले. शिवसेनेतील त्यावेळच्या माझ्या सहकाऱ्यांनी व सर्व शाखाप्रमुखांनी प्रचारासाठी जिवाचे रान केले. आर्थिक परिस्थिती नसतानाही केवळ शिवसैनिकांच्या बळावर व सहकार्यावर ती निवडणूक मी सहजगत्या जिंकली. राज्यात सर्वच मतदारसंघातील उमेदवारांकडून शिवसेनाप्रमुखांच्या झंजावाती सभांची मागणी करण्यात येत होती. केवळ योगायोगाने मतदानाच्या २४ तास आधी शिवसेनाप्रमुखांची मनमाडला सभा झाली आणि माझ्या अंगावर गुलाल पडला.राजाभाऊ देशमुख

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nandgaon-acनंदगाव