शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत जनतेने भारिपला साथ द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:42 IST

आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तमाम आंबेडकरी जनतेने जातीयवादी शक्तींना धडा शिकविण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाच्या पाठीमागे उभे राहून त्यांना साथ दिली पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांनी येवला येथे बोलताना केले.

ठळक मुद्देमीराताई आंबेडकर : येवला येथील मुक्तिभूमीवर जाहीर सभा

येवला : आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत तमाम आंबेडकरी जनतेने जातीयवादी शक्तींना धडा शिकविण्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाच्या पाठीमागे उभे राहून त्यांना साथ दिली पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांनी येवला येथे बोलताना केले.धर्मांतर घोषणेच्या ८३ व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुक्तिभूमी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत मीराताई आंबेडकर बोलत होत्या. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते डी. एम. उबाळे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे बौद्ध महासभेचे अध्यक्ष यू. डी. बोराडे, ज्येष्ठ नेते रूपवते, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, आगवणे, अनिकराव गांगुर्डे, भिवानंद काळे आदी उपस्थित होते.डॉ. आंबेडकरांनी येवला शहरात धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा करून जगाला समतेचा संदेश दिला आहे. आपण बौद्ध आहोत ही जाणीव सर्वांनी ठेवून बौद्धधम्माचे पालन करावे,असे आवाहनही मीराताई आंबेडकर यांनी केले. यावेळी पवन पवार,यू.डी. बोराडे, डी. एम. उबाळे, आगवणे, वि. म. रूपवते, अनिकराव गांगुर्डे, एम. आर. गांगुर्डे, भाऊसाहेब जाधव, डॉ. संजय जाधव आदींची भाषणे झाली.दरम्यान मीराताई आंबेडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यातयेऊन श्रामनेर शिबीरार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या निमित्ताने भिक्खु संघाच्या वतीने येवलाशहरातून प्रभातफेरी काढण्यातयेऊन शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी अनिकराव गांगुर्डे, भगवान साबळे, अमोल पगारे मारूती घोडेराव, छायाबाई साबळे यांच्यासह भीमसैनिकांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक