शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

ऐन निवडणुकीत  भाजपतील द्वंंद्व चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 01:38 IST

मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गिते यांच्यातील मध्यंतरी शमलेला वाद गिते यांच्या चिरंजिवांमुळे पुन्हा पेटला आहे.

नाशिक : मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गिते यांच्यातील मध्यंतरी शमलेला वाद गिते यांच्या चिरंजिवांमुळे पुन्हा पेटला आहे. शासनाचे महिला रुग्णालय भाभानगर येथील जागेतच करण्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न करणाऱ्या आमदाराचे काम म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याची तक्रार उपमहापौर प्रथमेश गिते यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. ती निकाली काढण्यात आली असली तरी यातून पुन्हा वाद वाढण्याची शक्यता आहे.राज्य शासनाचे महिला रुग्णालय भाभानगर येथे करण्यास माजी आमदार वसंत गिते यांचा विरोध होता. मात्र तरीही फरांदे यांनी हे रुग्णालय याच जागी करण्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केला. आचारसंहितेच्या अगोदरच या कामाचे भूमिपूजन झाले असल्याने फरांदे यांनी गितेंवर मात केली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर रुग्णालयाचे काम सुरू झाले अशी तक्रार उपमहापौर प्रथमेश गिते यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम खात्याचा अहवाल मागविला. त्यानुसार त्यांनी आदर्श आचारसंहितेच्या आधी म्हणजेच ५ मार्च रोजी कार्यारंभ आदेश दिला होता असे स्पष्ट केल्याने जिल्हा प्रशासनाने आचारसंहिता भंगाची तक्रार निकाली काढली आहे. अर्थात यामुळे उभयांतील राजकीय वाद वाढण्याची शक्यता अधिक आहे.दोन वर्षे उपमहापौरपदावर असूनही प्रथमेश यांना पक्ष आणि शासकीय कामकाज समजू शकलेले नाही. ते वयाने लहान आहेत. बालबुद्धी असल्याने किमान वडिलांचा सल्ला घेऊन कामकाज केले असते तर बरे झाले असते. या कामकाजात कोणतीही अनियमितता नाही. परंतु केवळ महिलांच्या रुग्णालय होऊ द्यायचे नाही म्हणून विरोध केला जात आहे.- देवयानी फरांदे, आमदारउपमहापौर प्रथमेशच नाही तर त्यांच्या वडिलांचा म्हणजेच माझाही विरोध आहे. कारण आम्ही परिसरातील नागरिकांबरोबर असून, त्यांच्या बरोबरीनेच ही तक्रार केली होती. प्रकरण न्याय प्रविष्ट असताना तसेच मध्य नाशिकमध्ये अनेक जागा असतानादेखील नागरिकांचा विरोध मोडून याच ठिकाणी महिला रुग्णालयाचा आग्रह कशासाठी? हा प्रश्न आहे.- वसंत गिते, माजी आमदार

टॅग्स :Devyani Farandeदेवयानी फरांदेhospitalहॉस्पिटलNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपा