शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात पोटनिवडणुकीत सेना-भाजपाची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 15:49 IST

प्रभाग क्रमांक १३ : मनसेची मदार भोसले कुटुंबीयांवर, दोन्ही कॉँग्रेस द्विधावस्थेत

ठळक मुद्देउभयतांकडून ताकदवार उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू पोटनिवडणुकीत सदर जागेसाठी मनसेकडून भोसले कुटुंबीयातील अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे

नाशिक - देश आणि राज्याच्या स्तरावर शिवसेना-भाजपात कमालीचा आलेला दुरावा पाहता, त्याचे पडसाद महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीतही उमटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सेना-भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागली असून उभयतांकडून ताकदवार उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रभागात पक्ष म्हणून मनसेचा प्रभाव नसल्याने पक्षाची मदार भोसले कुटुंबीयावरच असणार आहे तर कॉँग्रेस-राष्टवादीतही अंतर्गत बंडाळीच्या शक्यतेने द्विधावस्था निर्माण झालेली आहे.प्रभाग क्रमांक १३ (क) मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या ६ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी येत्या २० मार्चपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. आतापर्यंत केवळ एकच उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग १३ मध्ये मनसेच्या सुरेखा भोसले यांच्यासह कॉँग्रेसचे शाहू खैरे व वत्सला खैरे आणि राष्टवादीचे गजानन शेलार निवडून आले होते. त्यावेळी, याच प्रभागात मनसे, कॉँग्रेस आणि राष्टवादी अशी अघोषित युती बघायला मिळाली होती. आता, पोटनिवडणुकीत सदर जागेसाठी मनसेकडून भोसले कुटुंबीयातील अ‍ॅड. वैशाली मनोज भोसले यांचे नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे. सद्यस्थितीत मनसेचा राज्यभर ओसरलेला प्रभाव आणि नाशिकमध्येही झालेली वाताहत पाहता पोटनिवडणुकीत पक्ष म्हणून फारसा प्रभाव राहिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे, पक्षाची मदार ही सर्व भोसले कुटुंबीयावरच आहे. पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरे प्रचार सभेला येतील की नाही, याबाबत शंका आहे. त्यात, गर्दी जमविणारे स्थानिक असे नेतृत्व उरले नसल्याने पक्षाच्या चिंता वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत, मनसेच्या हातातून सदर जागा खेचून घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपाला महापालिकेतील गेल्या वर्षाच्या सत्ताकाळातील नागरिकांचा कौल अजमावण्याची या निमित्ताने संधी चालून आली आहे तर शिवसेनेने भाजपाच्या वर्षभराच्या कारभाराचा हिशेब मांडत समीकरणे बदलण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे, दोन्ही पक्षांकडून ताकदवार उमेदवाराला पसंती दिली जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक