शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 14:28 IST

घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ५ मार्चपासून उमेदवारांना आॅनलाईन नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. निवडणुकीची मतमोजणी २५ मार्चला होणार आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सक्रि य झाली असून इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली आहे.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण असणाऱ्या ३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ५ मार्चपासून उमेदवारांना आॅनलाईन नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. निवडणुकीची मतमोजणी २५ मार्चला होणार आहे. दरम्यान ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सक्रि य झाली असून इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली आहे. इगतपुरी तालुक्यातील वाकी, मुरंबी, देवळे, इंदोरे, रायांबे, उभाडे, मालुंजे, धामणी, म्हसुर्ली, आहुर्ली, धार्णोली, सोनोशी, समनेरे, बोरटेंभे, कावनई, खैरगाव, खडकेद, नांदूरवैद्य, अधरवड, शेवगेडांग, बारशिंगवे, कोरपगाव, मांजरगाव, कांचनगाव, बेलगाव कुर्हे, शेणवड बुद्रुक, पिंपळगाव मोर, पाडळी देशमुख, मायदरा धानोशी, पिंपळगाव भटाटा या ३० ग्रामपंचायतींची निवडणूक घोषित करण्यात आली आहे. उद्या २२ फेब्रुवारीला निवडणुकीच्या नोटीसीची प्रसिद्धी करण्यात येईल. आॅनलाईन नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी ५ मार्च ते ११ मार्चमुदत देण्यात आली असून दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ११ मार्चला ११ वाजेपासून करण्यात येणार आहे. माघारीसाठी १३ मार्चला दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर उमेदवारांना चिन्हवाटप आणि अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्धी १३ मार्चला दुपारी ३ वाजेनंतर होणार आहे. ३० ग्रामपंचायतींसाठी २४ मार्चला सकाळी ७. ३० ते५. ३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी २५ मार्चला करण्याचे घोषित झाले आहे. दरम्यान ३० ग्रामपंचायतीमध्ये तुल्यबळ लढती होणार असून यंदा प्रथमच थेट सरपंच पदासाठी निवडणूक होत असल्याने चुरस पाहायला मिळेल. इच्छुकांची धावपळ उडाली असून आरक्षण बदलले असल्याने कागदपत्रांची जमवाजमव सुरू झाली आहे. निवडणुक यंत्रणा सक्र ीयतेने नियोजन करीत आहे.----------------------३० गावांसाठी निवडणूक घेण्यासाठी आयोगाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. निवडणुकीशी संबंधितांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. निष्पक्ष निर्भीड वातावरणात निवडणुका घेण्यासाठी आम्ही सिक्र य आहोत.- वंदना खरमाळे, तहसीलदार इगतपुरी

टॅग्स :Nashikनाशिक