दिंडोरी : तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे घरगुती वादातून एका वृद्ध शेतकरऱ्याने पत्नीला काठीने मारहाण केली यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. दिंडोरी पोलिसांनी मयतवृद्धाविरु द्ध पत्नीच्या खुनाचा तसेच आत्महत्त्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत दिंडोरी पोलिसांकडून मिळालेली माहिती असी की, तळेगाव दिंडोरी येथील तातीराम अर्जुन उगले (८५) व गीताबाई उगले (७६) हे वृद्ध शेतकरी दांपत्य वस्तीवर राहत होते.रविवारी रात्री त्यांचेत वाद होवून तातीराम यांनी पत्नीस त्यांचे आधार घेण्याच्या बांबूच्या काठीने डोक्यात मारहाण केली त्यात ती जखमी होत मयत झाली यानंतर तातीराम यांनीही स्वत: राहत्या घरात दोरीने गळफास घेवून जीवनयात्रा संपवली . सकाळी त्यांचा दुसर्या शेतमळ्यात राहणारा मुलगा आला तेव्हा दरवाजा बंद आढळला त्यानंतर नातेवाईक जमा होत दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर सदर प्रकार उघडकीस आला. घटनेची खबर दिंडोरी पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक मधुकर गावित हवालदार आव्हाड,काकड आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला . दिंडोरी ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात तळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर दांपत्याच्या पश्चात दोन मुले ,मुली सुना नातवंडे असा परिवार आहे दिंडोरी पोलिसांनी मयत तातीराम उगले यांचेविरु द्ध पत्नीच्या खुनाचा तसेच स्वताचे आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर गावित करत आहे . (वार्ताहर)
वृद्ध पत्नीचा खून पतीचीही आत्महत्त्या
By admin | Updated: July 19, 2016 01:48 IST