लोकमत न्यूज नेटवर्कवणी : चिलबारी शिवारात उपचार करून दुचाकीने घराकडे परतणाऱ्या वृद्ध व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वणी ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्र वारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. तुळशीराम राऊत हे दुचाकीने कोशिंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्येत ठीक नसल्याने उपचारासाठी गेले होते. उपचारानंतर त्यांची कामे आटोपून ते कोशिंबा येथून टाक्याचा पाडा ते हस्ते या रस्त्यावरून परतीच्या प्रवासाला लागले. दुचाकीवरून प्रवास करताना अचानक बिबट्याने चिलबारी शिवारात त्यांच्यावर हल्ला केल्याने दुचाकीवरून ते खाली पडले. वाघाच्या हल्ल्यात त्यांना खोल जखम झाली. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. परिसरातील ग्रामस्थ येईपर्यंत बिबट्याने धूम ठोकली. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून, या भागात गेल्या काही दिवसातील हल्ल्याची ही चौथी घटना असून, तीन ते चार बिबट्यांचा याच भागात वावर असल्याची माहिती वामनराव राऊत यांनी दिली. बिबट्याच्या हल्ल्याची घटना सातत्याने घडत असल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:34 IST
वणी : चिलबारी शिवारात उपचार करून दुचाकीने घराकडे परतणाऱ्या वृद्ध व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वणी ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्र वारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध गंभीर
ठळक मुद्देबिबट्याने चिलबारी शिवारात त्यांच्यावर हल्ला केल्याने दुचाकीवरून ते खाली पडले.