सिन्नर : येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. कोंडू नारायण गवळी (५०) रा. माळेगाव एमआयडीसी, सुप्रिमो इंडस्ट्रिज, सिन्नर असे या अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. गवळी हे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना, सुनोसेम कंपनी समोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्ध ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 14:48 IST