समाज कल्याण सहायक आयुक्त सुंदरसिंग वसाव यांनी सांगितले की, ज्येष्ठत्वाची ओळख, ज्येष्ठ व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्या व उपाययोजना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या कायद्यांची व योजनांची ओळख अशा विविध विषयांवर प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींनी या प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करावी, असे आवाहनही सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.
सावली, सीएफआर, हेल्पेज इंडिया, फेस्कॉम व एएससीओपी या प्रशिक्षण संस्था व जिल्हास्तरीय कायदेशीर सेवा प्राधिकरण यांच्या समन्वयाने प्रशिक्षण होणार असून, प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींनी ९८६०९६४३२३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर नावनोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशिक्षणात फक्त ३० दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होता येणार आहे.