चांदवड- येथील पेट्रोल पंपावर मुलाची टपरी असून त्या टपरीतील देव्हाऱ्यासाठी पुजा साहित्य व फुले घेऊन जाणाºया वृध्देचा कारने धडक दिल्याने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मुबंई आग्रारोडच्याकडेला राजु ठोंबरे यांची टपरी असून आई जानकाबाई झिपरु ठोंबरे (७०) रा. गाडगेमबाबा चौक, चांदवड या दररोज सकाळी पुजेचे ताट घेऊन टपरीतील देवाला नमस्कार करण्यास जात असे. नित्याप्रमाणे त्या सकाळी टपरीकडे जात असतांना मुंबई आग्रारोडवरुन जात असणारी मारुती रिट्झ कार क्रमांक एम.एच. २३ / ए.डी.२३०९ हिने जानकाबाई यांना जोरदार धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाºयांनी मृत घोषित केले. याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक मोरे करीत आहेत.
मुलाच्या टपरीसमोरच वृद्धेचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 13:11 IST