मालेगाव : येथील माजी आमदार रशीद शेख व आसिफ शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मालेगाव शहर काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त होते. या रिक्त पदावर नगरसेवक एजाज बेग यांची वर्णी लागली आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालय माजी मंत्री आरिफ नसीम खान यांना काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदी निवडीचे पत्र दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या गोटात राजकीय उलथापालथ सुरू होती. माजी आमदार शेख यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर काँग्रेस पक्ष संघटन खिळखिळे झाले होते. या पार्श्वभूमीवर नगरसेवक बेग हे कॉंग्रेस पक्षात सक्रिय झाले होते. सोमवारी माजी मंत्री आरिफ नसीम खान यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात यांना बेग यांना अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. खान यांनी शहरात पक्ष संघटन, पक्ष विस्तार वाढवावा काँग्रेसला बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जमील क्रांती, जैनू कारी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान मालेगाव मनपा क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने तीन कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यतेचे पत्र काँग्रेसचे नवनियुक्त शहराध्यक्ष बेग यांना देण्यात आले आहे. महापालिकेचा २५ टक्के व राज्य शासनाचा ७५ टक्के हिस्सा यात राहणार आहे. या निधीतून शहरात विकासकामे केली जाणार असल्याची माहिती नवनियुक्त शहराध्यक्ष बेग यांनी दिली.
मालेगाव कॉंग्रेस शहराध्यक्षपदी एजाज बेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 00:29 IST
मालेगाव : येथील माजी आमदार रशीद शेख व आसिफ शेख यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मालेगाव शहर काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त होते. या रिक्त पदावर नगरसेवक एजाज बेग यांची वर्णी लागली आहे.
मालेगाव कॉंग्रेस शहराध्यक्षपदी एजाज बेग
ठळक मुद्देमालेगाव शहर काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त होते.