कसबे सुकेणे : कसबे सुकेणेच्या दाऊद शहावली बाबा दर्ग्यासमोरील नदीकाठची आणि शेजारील झोपडपट्टीही पुरात वाहून गेली आहे. स्थानिक प्रशासनाच्या सतर्कतेमुळे या ठिकाणच्या नागरिकांच्या स्थलांतरामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. कसबे सुकेणे येथे आठ झोपड्या वाहून गेल्या असून, सुमारे २० घरांची पुरामुळे पडझड झाली आहे तर नदीकाठच्या सर्व घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. सरपंच छगन जाधव, उपसरपंच परेश भार्गवे, तलाठी गायखे, ग्रामविकास अधिकारी गायकवाड, श्याम जाधव, बाळासाहेब भंडारे, प्रल्हाद धुळे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून आज बुधवारी तत्काळ पंचनामे केले. कसबे सुकेणे येथील नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करीत असल्याचे सरपंच छगन जाधव यांनी सांगितले.
कसबे सुकेणेत आठ झोपड्या वाहून गेल्या
By admin | Updated: August 3, 2016 22:48 IST