शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिकेतील स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 19:16 IST

नियमानुसार प्रक्रिया पूर्ण : सेना नगरसेवकाकडून स्थगितीचा प्रयत्न

ठळक मुद्देसत्ताधारी भाजपाचे सर्वाधिक ४, शिवसेनेचे २ आणि कॉँग्रेस व राष्टवादीच्या प्रत्येकी एका सदस्याचा महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारीला संपणार आहे

नाशिक - महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांना नियमानुसार चिठ्ठी पद्धतीने निवृत्त करण्यात आले. त्यात, सत्ताधारी भाजपाचे सर्वाधिक ४, शिवसेनेचे २ आणि कॉँग्रेस व राष्टवादीच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. दरम्यान, शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी वकिलामार्फत नोटीस देत निवृत्तीची प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली परंतु, सभापतींनी केवळ नोंद घेत प्रक्रिया पूर्ण केली.महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारीला संपणार आहे. त्यामुळे नियमानुसार आठ सदस्यांना निवृत्त करण्याची प्रक्रिया सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आली. सभापती शिवाजी गांगुर्डे यांनीच आपल्या हस्ते चिठ्ठया काढत आठ जणांची निवृत्ती जाहीर केली. त्यात सत्ताधारी भाजपाचे शशिकांत जाधव, अलका अहिरे, जगदीश पाटील व मुकेश शहाणे, शिवसेनेचे सूर्यकांत लवटे आणि डी. जी. सूर्यवंशी तर कॉँग्रेसच्या वत्सला खैरे आणि राष्टवादीचे राजेंद्र महाले यांचा समावेश आहे. त्यामुळे नियमानुसार, भाजपाचे शिवाजी गांगुर्डे, सीमा ताजणे, सुनिता पिंगळे, विशाल संगमनेरे आणि श्याम बडोदे, सेनेचे प्रवीण तिदमे व भागवत आरोटे आणि मनसेच्या कोट्यातून आलेले अपक्ष मुशीर सैय्यद यांना आणखी एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे. सत्ताधारी भाजपाने अधिकाधिक सदस्यांना स्थायीवर जाण्याची संधी मिळावी म्हणून उर्वरित सदस्यांचेही राजीनामे घेण्याचे यापूर्वीच जाहीर केले असल्याने पाचही सदस्यांना एक वर्षाचा कालावधी दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी अद्याप याबाबतचा निर्णय झाला नसल्याचे सांगत शहराध्यक्षच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेकडूनही एक वर्षाचाच फार्मूला राबविला जाण्याची शक्यता आहे. मनसेच्या कोट्यातून आलेले अपक्ष मुशीर सैय्यद यांना ठरल्याप्रमाणे पहिल्या आणि शेवटच्या वर्षी स्थायीचे सदस्यपद दिले जाणार असल्याने मुशीर सैय्यद यांच्याकडूनही मनसेकडून राजीनामा मागितला जाण्याची शक्यता आहे.महापालिकेला नोटीसशिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी विद्यमान स्थायी समितीच्या सदस्यांना पूर्ण एक वर्षाचा कालावधी मिळावा म्हणून विभागीय आयुक्तांना पत्र दिले होते. त्यानुसार, विभागीय आयुक्त कार्यालयातील प्रादेशिक उपसंचालक विजय कुलकर्णी यांनी महापालिकेला पत्र देत महाराष्ट महापालिका अधिनियम कलम २० मधील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केली. याशिवाय, तिदमे यांनी वकीलामार्फतही महापालिकेला नोटीस बजावत सदर निवृत्तीची प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. परंतु, सभापतींनी या दोन्ही पत्रांची नोंद घेत प्रक्रिया पूर्ण केली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका