जिल्ह्यातील आठ धरणे ओव्हरफ्लो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 01:22 AM2017-08-22T01:22:39+5:302017-08-22T01:22:59+5:30

 Eight dams overflow in the district! | जिल्ह्यातील आठ धरणे ओव्हरफ्लो!

जिल्ह्यातील आठ धरणे ओव्हरफ्लो!

Next

नाशिक : शनिवारपासून पुनरागमन झालेल्या पावसामुळे जिल्ह्णातील आठ धरणे ओव्हरफ्लो झाली असून, गंगापूर, दारणा, वाघाड, भावली या धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये सरासरी ७८ टक्के पाणीसाठा झाला असला तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत तो कमीच आहे.
गेल्या दोन दिवसांत जिल्ह्णात सर्व दूर पावसाने हजेरी लावल्यामुळे  शेतकरी वर्गात आनंद व्यक्त केला जात असून, नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. विशेष करून त्र्यंबकेश्वर येथे तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने गोदावरीचे पाणी शहरात शिरून जनजीवन विस्कळीत झाले तसेच नदी काठच्या व्यावसायिकांनाही नुकसान सोसावे लागले आहे. त्र्यंबकेश्वरच्या पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणाच्या साठ्यात पाच टक्क्याने वाढ झाली आहे. त्याचबरोबर कश्यपी, गौतमी गोदावरी हे धरणेही काठोकाठ भरली असून, आळंदी धरणात शंभर टक्के साठा झाल्याने त्यातून पाणी सोडण्यात येत आहे. गंगापूर धरण समुहात ९५ टक्के पाणीसाठा आहे. या पावसामुळे जिल्ह्णातील लहान-मोठे अशा २४ धरणांपैकी आठ धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यात आळंदी, वाघाड, ओझरखेड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर या धरणांचा समावेश आहे. धरणे भरल्यामुळे नद्यांमध्ये त्याचे पाणी सोडण्यात आले आहे. पालखेड धरण समूहात ९६ टक्के, तर गिरणा धरण समूहात ७८ टक्के पाणी साठले आहे. जिल्ह्णातील अन्य धरणांमध्ये ८० ते ९० टक्के पाणी असले तरी, पूर्व भागाकडे पावसाने वक्रदृष्टी केल्याने गिरणा धरणात ५२ टक्केच पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी जिल्ह्णातील धरणांमध्ये ५२,१७७ दशलक्ष घनफूट इतके म्हणजे ७९ टक्के पाणी होते, यंदा ५१,५९९ दशलक्ष घनफूट इतके पाणी साठले असून, त्याची टक्केवारी ७८ इतकी आहे.
सात धरणांतून विसर्ग
पावसाच्या संततधारेमुळे व धरण साठ्यात कमालीची वाढ झाल्याने जिल्ह्णातील गंगापूरसह सात धरणांमधून विसर्ग करण्यात येत आहे. त्यात गंगापूरमधून ३२१४, दारणा- १८५०, वालदेवी- १०५०, कडवा- २३२८, आळंदी- ६८७, पालखेड- १२०० क्यूसेक पाणी सोडण्यात आले असून, नांदूरमधमेश्वरमधून ३२,६९० क्यूसेक इतका विसर्ग मराठवाडा, नगरकडे सुरू आहे.
जायकवाडीला ४५ टीएमसी पाणी
नाशिक जिल्ह्णात जून व जुलै या दोन महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने धरणे चांगली भरली. गोदावरी, दारणा, कडवा या धरणांचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी पाणी सोडण्यात आल्याने आजपावेतो मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी ४५ टीएमसी इतके पाणी पोहोचले आहे. रविवारी सकाळपासून गंगापूरमधून पाणी सोडल्याने तीन टीएमसी पाणी सोमवारी दुपारपर्यंत रवाना करण्यात आले आहे. जायकवाडी धरणाची क्षमता ८० टीएमसी इतकी असून, त्यापैकी निम्म्याहून अधिक पाणी नाशिक जिल्ह्णातूनच रवाना झाल्याने धरणात ५६ टक्के पाणी साठा आहे.

Web Title:  Eight dams overflow in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.