शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मुद्देमालासह आठ दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 01:05 IST

घरफोडी आणि दुचाकी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यातील तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून आठ दुचाकींसह घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरोधात अंबड पोलीस ठाण्यात १० जूनला दाखल गुन्ह्याची चौकशी करताना अंबड पोलिसांना सुमारे १८ दुचाकी चोरींच्या प्रकरणांसह अंबड परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचीही उकल करण्यात यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी शनिवारी (दि.१६) पोलीस आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक : घरफोडी आणि दुचाकी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यातील तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून आठ दुचाकींसह घरफोडीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित आरोपींविरोधात अंबड पोलीस ठाण्यात १० जूनला दाखल गुन्ह्याची चौकशी करताना अंबड पोलिसांना सुमारे १८ दुचाकी चोरींच्या प्रकरणांसह अंबड परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचीही उकल करण्यात यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी शनिवारी (दि.१६) पोलीस आयुक्तालयातील पत्रकार परिषदेत दिली.नाशिकच्या अंबड एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत घरफोडी झाल्याबाबात अंबड पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या सूचनांवरून गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी वरचे चुंचाळे येथील रहिवासी विजय केशव गुप्ता (२१), प्रशिक ऊर्फ भुऱ्या बाळू भरीत (१९) व वरचे चुंचाळेच्याच आंबेडकरनगर येथील नवनाथ ऊर्फ डॉलर रामदास साळवे (१९) या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अबंड एमआयडीसीमध्ये कंपनीमध्ये चोरी केल्याची कबुली दिल्याने तिघांनाही अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.आरोपीने दिलेल्या जबाबावरून त्यांनी चार दुचाकी चुंचाळे शिवारातील एका विहिरीत फेकल्या असून, अन्य सहा दुचाकींविषयी आरोपींकडून माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण करीत असून, अटक केलेल्या आरोपींकडून अशाप्रकारचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मण पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून कंपनीतून चोरी केलेले एक लाख २५ हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या वस्तू जप्त करण्यात आले आहे, तसेच नवनाथ ऊर्फ डॉलर साळवेकडून चोरीची दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईतून अंबड, इंदिरानगर, मुंबई नाका व सातपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी झालेल्या दोन लाख ४० हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी चोरीचे गुन्हे उगडकीस आले आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा