शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव फाट्याजवळील टायर दुकानातून साडेआठ लाखाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 16:38 IST

सिन्नर : सिन्नर-नाशिक महामार्गावरील जिंदाल फाट्यावरील साई प्रसाद टायर्स या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी रोख 1 लाख रुपयांसह 8 लाख 22 हजारांचे 209 टायर्स चोरुन नेल्याची घटना घडली.

ठळक मुद्देअंदाजे किमत 7 लाख 22 हजार व गल्ल्यातील 1 लाख रोख असा 8 लाख 22 हजारांचा ऐवज घेऊन चोरटे फरार

सिन्नर : सिन्नर-नाशिक महामार्गावरील जिंदाल फाट्यावरील साई प्रसाद टायर्स या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी रोख 1 लाख रुपयांसह 8 लाख 22 हजारांचे 209 टायर्स चोरुन नेल्याची घटना घडली.माळेगाव येथील संदीप सांगळे यांचे जिंदाल फाट्यावर टायरचे दुकान असून बुधवारी कामानिमित्त ते बाहेरगावी गेले होते. रात्री उशिरा आल्याने दिवसभरात जमा झालेले लाखभर रुपये माणसाने गल्ल्यातच ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी शटरचे पाच कुलूप तोडून शटर उचकवत दुकानात प्रवेश केला. कार व मोटारसायकलचे मिळून विविध कंपन्यांचे 209 टायर्स अंदाजे किमत 7 लाख 22 हजार व गल्ल्यातील 1 लाख रोख असा 8 लाख 22 हजारांचा ऐवज घेऊन चोरटे फरार झाले. सकाळी दुकान उघडण्यासाठी सांगळे आले असता चोरीचा हा प्रकार लक्षात आला. दुकानाबाहेर दहा टायर वाहन येऊन गेल्याच्या खूणा जमिनीवर दिसल्याने आयशर अथवा अन्य वाहनात टायर भरुन चोरटे फरार झाल्याचे समोर आले आहे. दुकानात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवण्यात आले असून चोरट्यांनी कॅमेरे तसेच ठेवून कॅमेर्‍याचे फुटेज जमा होते ते डी.व्ही.आर. ही पळवून नेले. दुकानातील सर्वच टायर्स चोरी गेल्याने सांगळे यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. विशेष म्हणजे शटरला सेंटर लॉक असून दोन्ही बाजूला दोन-दोन कुलूपे असताना ते सर्वच तोडल्याने दुकानांच्या सुरक्षेसाठी अजून कुठल्या उपाययोजना करायच्या असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अप्पर पोलीस अधिक्षक शमिष्ठा घारगे- वालावलकर, उपअधिक्षक माधव रेड्डी, पोलीस निरिक्षक साहेबराव पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली व तपासी अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस