शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुस-याच्या घरट्यात अंडी घालण्याची वृत्ती घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 16:22 IST

हरिश्चंद्र चव्हाण : कामांचे श्रेय लाटणा-यांवर आरोप

ठळक मुद्देरस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले

पेठ - काही पक्षी स्वत:चे घरटे न बांधता दुस-याच्या तयार घरटयात अंडी घालत असतात. अशीच काहीशी वृत्ती राजकारणातही दिसून येत असून स्वत:चे बेगडी कर्तृत्व सिध्द करण्यासाठी इतरांनी प्रयत्न करून मंजूर करून आणलेल्या विकास कामांचे श्रेय लाटण्याचा केवीलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोप खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केला आहे.आदिवासी विकास उपयोजनेंतर्गत पेठ तालुक्यातील उभिधोंड, बोरवठ, उस्थळे, देवगाव, कोहोर, रूईपेठा, दोनावडे, शिंगदरी, मुरूमट्टी, चोळमुख येथील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले. पेठ तालुक्यातील शिंगदरी येथे झालेल्या सभेत बोलतांना चव्हाण यांनी सांगितले की, पेठ तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून रस्ता सुधारण्याची सर्वच लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारचे पक्षीय मतभेद न ठेवता विकासाच्या मुद्यावर एकत्र येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री बापू पाटील, सभापती पुष्पा गवळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत भदाणे, सुनिल केदार, अजित ताडगे, तालुकाध्यक्ष पद्माकर कामडी, गटनेते भागवत पाटील, कांतीलाल राऊत, रामदास भोये, पंढरीनाथ जाधव, रघुनाथ चौधरी, राजेंद्र शिंदे, निवृती गालट, नंदू गवळी, पुंडलिक भोये, सोमनाथ जाधव, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, उपअभियंता कोकरे,सरपंच यमूना कुवर, सोनाली कामडी, कविता महाले यांचेसह सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.राम -रावण वादात आदिवासीसध्या आदिवासी समाजासमोर विकासाची अनेक आवाहने आ वासून उभी असतांना आदिवासींच्याच काही तथाकथित संघटनांकडून राम आणि रावण या मुद्यावर आदिवासी जनतेला गुंतवून ठेवले जात आहे. बोगस आदिवासींचे होणारे अतिक्र मण मुळ आदिवासी साठी घातक ठरणारे असून आदिवासी समाजाने आता याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे खा. चव्हाण यांनी सांगितले. अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता धनगर समाजाला आरक्षण द्यावे. मात्र त्यांना अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यात येऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

टॅग्स :NashikनाशिकHarishchandra Chavanहरिश्चंद्र चव्हाण