लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : तालुक्यातील जामदरी शिवारात वनविभागाच्या हद्दीत हरिणांची शिकार करण्यासाठी आलेल्या दोघा संशयिताना सतर्क ग्रामस्थांनी पकडले. जामदरी परिसरात मोठ्या प्रमाणात हरिणांचे कळप कायम दिसत असतात. त्यामुळे गिरणा डॅमकडे शिकारींचा मोठा राबता असतो. शुक्रवारी सायंकाळी उशिरा मोपेड दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा जणांना गावकऱ्यांनी हटकले. या दोघांकडे शस्त्र आढळले असून, शस्त्राला काळेपांढरे केस मिळून आल्याने हरिणाच्या शिकारीचा त्यांनी प्रयत्न केल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी वनविभागाला ही बाब कळविली. परिमंडळ अधिकारी खेमनर, भालेराव, आमोलक, खैरनार, पवार, बाळासाहेब आहेर, गोपाळ राठोड आदींच्या पथकाने कारवाई केली. यात हत्या केलेले हरीण कुठे ठेवले याचा तपास वनविभाग व पोलीस करीत आहेत.
हरिणांच्या शिकारीचा प्रयत्न; दोघे ताब्यात
By admin | Updated: July 8, 2017 23:05 IST