शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

नाशिकला कमर्शियल हब बनविण्यासाठी प्रयत्नांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 16:44 IST

नाशिक : सुरुवातीच्या काळात विशिष्ट वस्तूंसाठी ठरावीक ठिकाणे प्रसिद्ध होती. आता काळानुरूप छोट्या-मोठ्या गावांत टोलेजंग शोरूम्स उभी राहिली आहेत. तालुकास्तरावर आणि एकूणच उत्तर महाराष्ट्रातील बाजारपेठा विकसित होण्याचा वेग पाहता नाशिकच्या मार्केटमध्ये अजूनही उणिवा जाणवतात. लोकांची बदलती जीवनशैली व वाढत्या क्रयशक्तीचा विचार करता आगामी दशकात काळाची पावले ओळखून नाशिकला कमर्शियल हब बनविण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत नाशिकच्या मातीशी एकजीव झालेल्या व्यावसायिकांनी नोंदविले.

ठळक मुद्देशहरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक मॉल्सच्या संचालकांचे मत

नाशिक : सुरुवातीच्या काळात विशिष्ट वस्तूंसाठी ठरावीक ठिकाणे प्रसिद्ध होती. आता काळानुरूप छोट्या-मोठ्या गावांत टोलेजंग शोरूम्स उभी राहिली आहेत. तालुकास्तरावर आणि एकूणच उत्तर महाराष्ट्रातील बाजारपेठा विकसित होण्याचा वेग पाहता नाशिकच्या मार्केटमध्ये अजूनही उणिवा जाणवतात. लोकांची बदलती जीवनशैली व वाढत्या क्रयशक्तीचा विचार करता आगामी दशकात काळाची पावले ओळखून नाशिकला कमर्शियल हब बनविण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत नाशिकच्या मातीशी एकजीव झालेल्या व्यावसायिकांनी नोंदविले."लोकमत"च्या नाशिक आवृत्तीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाच्या अनुषंगाने शहरातील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक मॉल्सच्या संचालकांशी संवाद साधण्यात आला. याप्रसंगी त्यांनी उपरोक्त अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी आयोजित चर्चेत साखला फर्निचर मॉलचे संचालक नंदकिशोर साखला, आर्टलाइन फर्निचरचे संचालक प्रेम नंदवाणी, पारख अप्लायन्सचे संचालक रवी पारख, फर्निचर किंगचे संचालक शंकर अग्रवाल, इंट्रो फर्निचरचे संचालक शिरीष वाबळे, डिझायर सोफा मॉलचे संचालक केजेश सत्रा व आर्टलाइन फॅशनचे संचालक महेंद्र नंदवाणी सहभागी झाले होते. ह्यलोकमतह्णचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी उपस्थितांचे स्वागत करून चर्चेत भाग घेतला.कोरोनाने लॉकडाऊन काळात प्रत्येकाला घरात सक्तीने बंदिस्त केल्यामुळे लोकांचा स्वत:कडे, तसेच जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. लोक स्मार्ट होत चालले असून, ज्यांना खरोखर काही खरेदी करायचे तेच घराबाहेर पडत आहेत. ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेचा विचार करता मुंबई, पुण्यात मिळणाऱ्या वस्तू नाशिकमध्ये कशा उपलब्ध होतील यावर विचार करणे आवश्यक असल्याचा सूरही या चर्चेत उमटला. यावेळी ऑनलाइन मार्केटिंग तसेच भाडेतत्त्वावर मिळणाऱ्या वस्तूंच्या उपलब्धतेबाबतही चर्चा करण्यात आली.स्पर्धेसोबत उलाढालही वाढलीपूर्वी दुकानांची संख्या मर्यादित होती. अल्प विक्रीत विक्रेता आणि ग्राहकही खुश होते. विक्रेता जी वस्तू दाखवायचा व सुचवायचा त्यावर विश्वास ठेवून ग्राहक खरेदी करायचे. आता वस्तूंमध्ये आलेल्या नावीन्यामुळे आणि अर्थपुरवठा करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने ग्राहक जागरूक झालेला असून, त्याची अभिरुचीही बदललेली आहे. त्यामुळे ग्राहक मागेल ते आता पुरवावे लागते. प्रारंभी नानाविध फर्निचर व इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे या गोष्टी फक्त श्रीमंतांच्या असतात असा समज होता. आता त्या सर्वांसाठी दैनंदिन गरजेच्या भाग बनल्या आहेत. त्यामुळे व्यवसायामध्ये स्पर्धा वाढलेली असली तरी त्या तुलनेने उलाढालही वाढल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Marketबाजारbusinessव्यवसाय