शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

गुरेवाडी शाळेत टाकाऊपासून शैक्षणिक साहित्यनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:30 IST

शालेय जीवनात बौद्धिक विषयांच्या अध्यापनाकडे शिक्षकांचा कल अधिक असतो. तुलनेने कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण हे विषय दुर्लक्षित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास खीळ बसते. सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ निर्माण करून देणे शिक्षकांचे आद्यकर्तव्य आहे. हीच बाब हेरून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गुरेवाडी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी वार्षिक परीक्षा संपताच छंदवर्गाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले.

सिन्नर : शालेय जीवनात बौद्धिक विषयांच्या अध्यापनाकडे शिक्षकांचा कल अधिक असतो. तुलनेने कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण हे विषय दुर्लक्षित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास खीळ बसते. सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना व्यासपीठ निर्माण करून देणे शिक्षकांचे आद्यकर्तव्य आहे. हीच बाब हेरून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गुरेवाडी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी वार्षिक परीक्षा संपताच छंदवर्गाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले.गुरेवाडी शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नैसर्गिक खेळांचा आनंद ही मुले घेत असली तरी त्यांना प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे खेळांच्या साहित्याची वानवा असते. मुख्याध्यापक पद्मा एन्गुंदल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक आशा चिने यांनी पदरमोड करीत बॅट, बॉल, स्टंप आदी क्रि केटच्या साहित्यासोबत इतर खेळांचे साहित्य विकत घेत विद्यार्थ्यांच्या छंदाला प्रोत्साहन दिले. क्रिकेटच्या एका संघात असलेले खेळाडू, पंच, गोलंदाज, फलंदाज, यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षक यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगत विद्यार्थ्यांसोबत खेळाचा आनंद लुटला. त्याचप्रमाणे छंदवर्गात टाकाऊपासून शैक्षणिक साहित्यनिर्मिती, परिसरातून उपलब्ध होणारे रंगीबेरंगी खडे, काड्या, चिंचोके, विविध झाडांच्या बियांंपासून सुंदर कलाकृती विद्यार्थ्यांकडून बनवून घेण्यात आल्या. मातीपासून विविध वस्तू, फळे, मूर्ती तयार करण्यात आल्या. शाळेत पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची सोय करत भूतदयेची शिकवण कृतीतून देण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थितीत झाडे जिवंत ठेवण्यासाठी खोडाला दगडगोटे, पालापाचोळ्याचे आच्छादन तयार करण्याचे साधे मात्र परिणामकारक तंत्रही विकसित करण्यात आले आहे. बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकास तितकाच महत्त्वाचा आहे. शारीरिक क्षमतेबरोबर व्यक्तीतील इतर महत्त्वाच्या गुणांचा विकास खेळामुळे घडतो. बहुतेक लोक खेळाकडे मनोरंजन व शारीरिक व्यायाम या दृष्टिकोनातून पाहतात. खेळामुळे मानवातील इतर सुप्तगुणही विकसित होत असल्याने व्यक्तिमत्त्व विकासात शारीरिक क्षमता वाढविताना खेळाला महत्त्व दिले पाहिजे. खेळामुळे खिलाडूपणा, सांघिकवृत्ती, सहकार्याची भावना, नेतृत्वगुण, एकाग्रता, सहनशीलता, आत्मविश्वास वाढीस लागतो. स्पर्धा करण्याची ईर्षाही निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे आशा चिने यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण