शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक दाखले, सातबारा उताऱ्यांनाही विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:24 IST

शेतकरी वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आॅनलाइन सेवेतील गोंधळ वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासाठी लागणाºया दाखल्यांना विलंब होत आहे, तर सातबारा उतारा संगणकीकरण करण्याच्या कामातही दिरंगाई होत असल्याने सर्वांचीच कामे अडकून पडली आहेत.

नाशिक : शेतकरी वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या आॅनलाइन सेवेतील गोंधळ वाढल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासाठी लागणाºया दाखल्यांना विलंब होत आहे, तर सातबारा उतारा संगणकीकरण करण्याच्या कामातही दिरंगाई होत असल्याने सर्वांचीच कामे अडकून पडली आहेत. सर्व्हरवर आलेल्या ताणामुळे संपूर्ण यंत्रणेत व्यत्यय येत असल्यामुळे दाखले आणि उतारे मिळण्यास मोठी अडचण निर्माण झालेली आहे. याप्रकरणी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सातबारा उताºयाची कामे कर्मचाºयांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.सातबारा उतारे संगणकीकरण करण्याचे काम सध्या सुरू असून सदरील आॅनलाइनच्या नावाने तलाठी सातबारा उताºयांवरील नोंदी करणे तसेच नवीन सातबारा उतारा तयार करण्याच्या कामांना विलंब करीत असल्याचे राष्टÑवादीने निवेदनात म्हटले आहे. या विलंबामुळे शेतकºयांच्या जमिनीच्या व्यवहारावरदेखील परिणाम होत आहे. शेतकºयांना दैनंदिन कामासाठी लागणारे सातबारा उतारे उपलब्धच होत नसल्यामुळे आॅनलाइन सातबारा उताºयाचे काम सुरू असेपर्यंत नवीन सातबारा उतारे तयार करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे.गेल्या काही दिवसांपासून शासनाकडून वितरित करण्यात येणारे शालेय उपयोगी दाखले, शेतजमिनीच्या कामासाठी लागणारे सातबारा उतारे, रेशनकार्ड आदी सेवा आॅनलाइन पद्धतीने पुरविल्या जातात. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाल्यामुळे आॅनलाइन कागदपत्रे मिळविण्यासाठी मोठी अडचण निर्माण झालेली आहे. सर्व्हर डाउनमुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प होण्याचा प्रकार बंद होत नाही तोच लिंक ओपन न होण्याचा प्रकार सुरू झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सातत्याने महाआॅनलाइन केंद्रात चकरा माराव्या लागत आहेत. दाखले तयार होण्याची प्रक्रियाच थंडावल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशाचाप्रश्न निर्माण झाल्याचा आरोप राष्टÑवादीकडून करण्यात आला आहे.संपूर्ण विस्कळीत झालेली यंत्रणा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा राष्टÑवादीचे अ‍ॅड. सुरेश आव्हाड, प्रकाश माळोदे, नसीर पठाण, शेख मोहिय्योद्दिन हाजी शेख, विकी भुजबळ, प्रमोद मंडलिक, राजेश पांडे, अ‍ॅड. संदीप दंडगव्हाण, राजेश जाधव, रेखा शेलार, सुरेखा पाठक, भारती चित्ते यांनी दिला आहे.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दाखले तयार झाले असले तरी त्यावर अधिकाºयांच्या डिजिटल स्वाक्षरी होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या दाखल्यांना विलंब होत आहे. विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलिअर आदी दाखले अडकून पडले आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस