शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

पोलिसांना ‘ई-अकॅडमी’द्वारे शिक्षण : बजाज

By admin | Updated: January 15, 2015 00:14 IST

पोलिसांना ‘ई-अकॅडमी’द्वारे शिक्षण : बजाज

नाशिक : महाराष्ट्र पोलीस अकादमीत ई-अकॅडमी सुरू करण्यात येणार असून, त्याबाबचा प्रस्तावही वरिष्ठांना पाठविण्यात आला आहे़ या उपक्रमामुळे राज्यातील विविध स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांना पोलिसांसंबंधी विविध विषयांची माहिती व प्रशिक्षण संगणकाद्वारे देणे शक्य होणार असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक नवल बजाज यांनी पत्रकार परिषदेत दिली़ अकादमीद्वारे पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासंदर्भात माहिती देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते़बजाज पुढे म्हणाले की, ई-अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांना आॅनलाइन शिक्षण देता यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, विविध विषयांसंदर्भात माहिती व कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ पोलीस अधिकाऱ्यांसाठी वर्षातून सहा दिवसांचे प्रशिक्षण आवश्यक असून, ते या माध्यमातून देण्याचा आमचा मानस आहे़ त्यासाठी येत्या काही महिन्यांत अद्ययावत यंत्रणा उभारण्यात येणार आहे़ या अकादमीच्या माध्यमातून त्याला आवश्यक असलेले प्रशिक्षण व विविध विषयांची माहिती ई-मेलच्या माध्यमातून दिली जाईल. याचा फायदा प्रत्येक अधिकाऱ्याला अपडेट राहण्यासाठी होईल़ तसेच कायद्यातील विविध पुस्तकांचे भाषांतर करून ही पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात येत आहेत़अकादमीत नवीन पोलीस अधिकाऱ्यांना मूलभूत व राज्यस्तरीय प्रशिक्षण दिले जाते़ मूलभूत प्रशिक्षणामध्ये आंतरवर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षणाचा अंतर्भाव असून, यामध्ये कायदा, पोलीस मॅन्युअल, गुन्हे तपासासंबंधी विषयांचा समावेश आहे, तर बाह्य वर्गात शारीरिक प्रशिक्षण आहे़ पोलिसांसमोरील सद्यस्थितीची आव्हाने पाहता प्रशिक्षणार्थींना पोलीस ठाणे व्यवस्थापन, मानवी वर्तणूक, पोलीस संरचना, संगणक, सायबर क्राईम या विषयांचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे़ तसेच संबंधित कार्यक्षेत्रातील अनुभवी व्यक्ती त्यांना येऊन मार्गदर्शन करतात़अकादमीत प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन दिले जाते, तसेच प्रिव्हेटिव्ह अ‍ॅक्शन, मॉकड्रील, खुनाचा तपास, महिलांवरील अत्याचार यासंदर्भातील छोट्या कालावधीतील कोर्सेसही सुरू करण्यात आलेले आहेत़ यामुळे प्रशिक्षणार्थीला सर्वच बाबतीत ज्ञान मिळते. (प्रतिनिधी)