शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कसा होणार ‘सबका विकास’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 09:00 IST

पावसाळा सुरू झाला की, पाण्याविषयी सर्वाधिक जागरुकता केली जाते. राज्य शासनाचा आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था या पाणी उकळून प्या, पाणी उघड्यावर साठवू नका अशी आवाहने करतात.

- मिलिंद कुलकर्णीपावसाळा सुरू झाला की, पाण्याविषयी सर्वाधिक जागरुकता केली जाते. राज्य शासनाचा आरोग्य विभाग, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था या पाणी उकळून प्या, पाणी उघड्यावर साठवू नका अशी आवाहने करतात. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्यादृष्टीने हा प्रयत्न असतो. जिल्हा पातळीवर पाणी तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वीत असतात. जिल्हाभरातील पाणीस्त्रोतांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी या प्रयोगशाळेत येतात. पिण्यायोग्य पाणी आहे काय, याविषयी ही प्रयोगशाळा अहवाल देते. त्यानुसार स्थानिक यंत्रणा त्या जलस्त्रोताविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचे कार्य करते.

आजार होण्यापेक्षा प्रतिबंधाला महत्व देणे योग्यच आहे. त्यादृष्टीने विविध उपाययोजना राबवल्या जातात. परंतु शासनाची ही जागरुकता मोहीम नेहमीप्रमाणे दुर्गम भागात पोहोचत नाही. धुळे जिल्ह्यातील अनेर धरण अभयारण्य परिसरातील पीरपाणी या पाड्याला भेट दिली असता तेथील आदिवासी बांधव हे एका मोठ्या खड्डयातील पाणी पिण्यासाठी वापरत असल्याचे दिसून आले. नाल्याचे पाणी अडवून तेथे मोठा खड्डा वनविभागाने केला आहे. त्याचे पाणी ६० कुटुंबे असलेल्या गावात पिण्यासाठी वापरले जाते. शिरपूर तालुक्यातील चिलाणे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत सातपुड्याच्या डोंगररांगामध्ये हा पाडा वसलेला आहे. ग्रामपंचायतीने एक-दोन हातपंप केले आहेत, पण उन्हाळ्यात ते पाणी आटते. पहिल्या पावसाने नाल्याला पाणी आले आणि ते खड्डयात साचले. पाड्यावरील आबालवृध्द पाण्यासाठी कळशा घेऊन तेथे जातात. पलिकडे आणखी मोठा खड्डा करुन पाणी अडविले आहे, ते धुण्यासाठी, गुरांच्या पाण्यासाठी वापरले जाते.हिरवट रंग असलेले पाणी सर्रास पिण्यासाठी वापरले जाते. हे पिण्यायोग्य पाणी आहे किंवा नाही, याविषयी त्यांना माहितीच नाही. डोंगररांगामध्ये असलेल्या या पाड्यापासून ग्रामपंचायत असलेले चिलाणे हे गाव सुमारे ७-८ कि.मी.अंतरावर आहे. मुळात अभयारण्य परिसरात हे पाडे असल्याने वनविभागाच्यादृष्टीने हे सगळे अतिक्रमण आहे. ते कसत असलेली शेती वनहक्क कायद्याच्या लढाईत अडकलेली आहे. वनविभागाची जागा असल्याने कोणतेही पक्के बांधकाम याठिकाणी करता येत नाही. रस्ता नाही, वीज नाही, आरोग्य केंद्र नाही, पाण्याची सोय तर आणखी दूर. काही तरुणांना जेव्हा या पाण्याच्या तपासणीविषयी विचारले असता अशी तपासणी होते, हेच त्यांच्या गावी नव्हते.

पावसाळ्यात पाण्यामुळे होणाऱ्या आजारांविषयी तर या मंडळींना गंधवार्तादेखील नाही. त्यामुळे केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी ‘आयुष्यमान योजना’ आणली असली तरी ती या मूळ लाभार्भींपर्यंत पोहोचणार कशी? मुळात आजाराला प्रतिबंधासाठीच प्रयत्न नाहीत, तर आजारी पडल्यावर उपचाराची बात आली कुठे? असा हा प्रकार आहे. आदिवासी बांधवांसाठी उज्ज्वला गॅस योजनेद्वारे गॅस व शेगडी पाड्यात पोहोचली. वनविभागाच्या पुढाकाराने प्रत्येक घरावर सौरउर्जा पॅनल आले. पण पाण्यासाठी काही प्रयत्नदेखील नाही. पावरी भाषेत बोलणा-या या मंडळींना आपले मराठी कळायला आणि बोलायला अवघड जाते. समस्येविषयी जाण नसल्याने हक्क, अपेक्षांची कल्पना करणे त्यांना दुरापास्त आहे.

आर.ओ.वॉटर, मिनरल वॉटर, बिसलरी वॉटर असे शुध्द पाणी पिण्याचा रास्त आग्रह असलेला नागरी समाज एकीकडे आणि पाड्यात पावसाचे पाणी आल्याने ३-४ कि.मी.चा हंडाभर पाण्यासाठी हेलपाटा वाचल्याचा आदिवासी महिलेच्या चेह-यावरील आनंद अशी विपरीत स्थिती आपल्याकडे आहे. अशा परिस्थितीत सगळ्यांपर्यंत विकास कसा पोहोचेल, हा प्रश्न मनाला भिडल्याशिवाय राहत नाही.