तेलाचे दर (प्रति लिटर)
ऑगस्ट सप्टेंबर
सोयाबीन -१५०- १४०
सूर्यफूल- १६५-१५५
पामतेल - १३५-१३०
शेंगदाणा- १६५-१७०
चौकट-
म्हणून दर झाले कमी
बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मध्यप्रदेशात तर एकाचवेळी बाजारपेठांमध्ये एक लाख गोण्यांची आवक झाल्याने सोयाबीनच्या तेलाचा दर उतरला. त्याचा परिणाम सूर्यफूल आणि इतर तेलांवरही झाला असून, दर उतरले आहेत. पुढील सप्ताहात आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर आणखी उतरण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम आपल्याकडील दरांवरही होण्याची शक्यता आहे.
चौकट-
किराणा खर्चात बचत
कोट-
आम्हाला महिन्याला पाच ते सहा लिटर खाद्यतेल लागते. त्यात फारशी काटकसर करता येत नाही. यामुळे दर कमी झाल्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला आहे. सध्या डाळींचे दरही स्थिर असल्याने किराणा मालाच्या खर्चात थोडीफार बचत होण्याची अपेक्षा आहे. - नंदिनी मोरे, गृहिणी
कोट-
स्वयंपाक घरातील सामानात महिन्याकाठी फार काही काटकसर करता येत नाही. जेवढे लागते तेवढे आणावेच लागते. या महिन्यात मात्र तेलाचे दर उतरल्याने थोडीफार बचत होऊ शकते. किराणा मालात बचत झाली तरी त्याचा आनंद सर्वसामान्यांना फार काळ घेता येत नाही. दुसरीकडे कशात तरी दरवाढ झालेलीच असते. - रोहिणी पवार, गृहिणी