शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
5
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
6
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
7
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
8
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
9
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
10
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
12
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
13
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
14
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
15
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
16
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
17
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
18
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
19
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
20
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट

‘वसाका’वर अवसायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:57 IST

सध्या डीव्हीपी ग्रुपच्या धाराशिव सहकारी साखर कारख्यान्याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या वसाकावर बुधवारी (दि. १९) अवसायकाची नेमणूक करण्यात आली. विशेष लेखापरीक्षक (साखर वर्ग-१) राजेंद्र देशमुख यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी कार्यस्थळावर कार्यकारी संचालक बी.डी. देसले यांच्या उपस्थितीत गुरुवारी पदभार स्वीकारला.

ठळक मुद्देप्रादेशिक उपसंचालकांचा आदेश : देशमुख यांच्याकडे कार्यभार

लोहोणेर : सध्या डीव्हीपी ग्रुपच्या धाराशिव सहकारी साखर कारख्यान्याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या वसाकावर बुधवारी (दि. १९) अवसायकाची नेमणूक करण्यात आली. विशेष लेखापरीक्षक (साखर वर्ग-१) राजेंद्र देशमुख यांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी कार्यस्थळावर कार्यकारी संचालक बी.डी. देसले यांच्या उपस्थितीत गुरुवारी पदभार स्वीकारला.गेली तीन-चार वर्षे बंद असलेला वसाका आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या प्रयत्नाने सुरू करण्यात आला; मात्र कर्जाच्या डोंगराखाली असल्याने व बँकांनी कर्ज देण्यास नकार दिल्याने वसाका चालविणे एक आव्हान ठरले होते. त्यामुळे आमदार आहेर यांच्या नेतृत्वाखालील प्राधिकृत मंडळाने वसाका भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला. त्यास विशेष सभेमध्ये सभासद व कामगारांनी सहमती दर्शविली. त्यानुसार वसाका डी.व्ही.पी. ग्रुपच्या धाराशिव कारखान्यास आॅक्टोबर महिन्यात भाडेतत्त्वावर देण्यात आला.दरम्यान, वसाकावर कामकाज पाहत असलेल्या प्राधिकृत मंडळाची मुदत संपत आल्याने दोन वेळेस मुदतवाढही देण्यात आली. (पान ७ वर)परंतु तिसऱ्या वेळेस मुदतवाढ देणे शक्य नसल्याने अखेर अहमदनगरच्या प्रादेशिक उपसंचालकांनी कलम १०३ (१) नुसार अवसायक म्हणून विशेष लेखा परीक्षक (साखर वर्ग-१) राजेंद्र देशमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर यांच्या उपरोक्त आदेशानुसार दि. १९ रोजी वसाका कार्यस्थळावर येऊन राजेंद्र देशमुख यांनी कार्यकारी संचालक बी.डी. देसले यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी धाराशिव कारखान्याचे संचालक संतोष कांबळे व खरात यांनी देशमुख यांचा सत्कार केला. याप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय पाटील, मनोहर जावळे, भाऊसाहेब देशमुख, रवींद्र सावळे, पवार आदींसह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSugar factoryसाखर कारखाने