इंदिरानगर : मुंबई नाका ते हॉटेल छान लगतहून प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांनी परराज्यातून आलेल्या भाविकांकडून अवाच्या सवा भाडे आकारून आर्थिक लूट केल्याची चर्चा सुरू होती. हॉटेल छानच्या लगत अंतर्गत वाहनतळ असल्याने या ठिकाणी वाहनांची पार्किंग करण्यात आली होती. या ठिकाणी दिवसभरातून ५० ते ६० वाहने उभी होती. येथून रामकुंडावर जाण्यासाठी रिक्षाचा वापर करणाऱ्या भाविकांना मात्र चालकांनी चांगलेच लुटले. वाजवीपेक्षा अधिक भाडे घेण्यात आल्याची तक्रार भाविकांकडून करण्यात येत होती. विल्होळी येथील वाहनतळ तसेच पाथर्डीपर्यंत भाविकांची रिक्षाचालकांनी वाहतूक केली. भाडे आकारणीवरून भाविक आणि चालकांमध्ये कित्येक ठिकाणी वादविवाद होतानाचे चित्र दिसत होते. द्वारका ते पाथर्डी फाटा १५ ते २० रुपये, तर विल्होळी वाहनतळापर्यंत २०० ते ३०० रुपये भाडे आकारले जात होते.
रिक्षाचालकांकडून भाविकांची आर्थिक लूट
By admin | Updated: September 13, 2015 22:47 IST