शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सप्तश्रृंग गडावरील अर्थचक्र मंदावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:17 IST

कळवण : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सप्तश्रृंग निवासनीच्या गडावरील अर्थचक्र कोरोनामुळे मंदावले असून, व्यावसायिकांचे जगणे ’लॉक’ झाल्याची भावना व्यक्त होत अहे. कोरोनाचे संम्कट केव्हा दूर होईल आणि देवी भक्तांना दर्शनासाठी मंदिर कधी कुले होईल याची आस लागली आहे.

कळवण : उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री सप्तश्रृंग निवासनीच्या गडावरील अर्थचक्र कोरोनामुळे मंदावले असून, व्यावसायिकांचे जगणे ’लॉक’ झाल्याची भावना व्यक्त होत अहे. कोरोनाचे संम्कट केव्हा दूर होईल आणि देवी भक्तांना दर्शनासाठी मंदिर कधी कुले होईल याची आस लागली आहे.सप्तश्रंग गडावर कोणतेही इतर उपजीविकेचे साधन नसल्याने अर्थचक्र पूर्णत: थांबले आहे. वर्षभरात दोन यात्रोत्सव व दैनंदिन येणार्या भाविकांमुळे अनेकांच्या हाताला येथे काम मिळते. फुल, प्रसाद, खण-नारळ विक्र ेता, पार्किंग, हॉटेल व्यवसाय करणार्या अनेकांसाठी सप्तशृंग गड म्हणजे पोटापाण्याची सोय आहे. मात्र, कोरोनाचा कहर सुरू झाला व गडावरील व्यावसायिकांचे जगणेच लॉक झाले आहे. भाविक, पर्यटकांसाठी देवीदर्शन खुले करावे, नियमांचे पालन करीत गडावर दर्शन सुविधा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.कळवण हा आदिवासी व ग्रामीण तालुका आहे. तालुक्यातील साडेनऊ हेक्टरवर पसरलेल्या सप्तशृंगी गडावर राहणार्या प्रत्येक घटकाची दिनचर्या मंदिर व भविकांवरच अवलंबून आहे. इथे ना शेती ना अन्य दुसरा व्यवसाय करण्यास वाव. मात्र कोरोनामुळे सध्या गडावर शुकशुकाट पसरला आहे. बंद दुकाने, सुनासुना परिसर पाहून येथली रहिवाशी रडकुंडीला आले आहेत. दररोज पहाटे धुक्याच्या मखमली दुलईतून गड जागा होतो. चोहीकडे निसर्ग खुललेला असतो. धबधबे खळाळत असतात. पानफुलं, पक्षी साद घालत असतात. मात्र काही क्षणात वास्तवाचे सूर्यकिरण गडावर येतात आणि येथील रहिवाशांसाठी पुढचा संपूर्ण दिवस भाकरीचा चंद्र शोधण्यातच जातो. बहरलेला निसर्ग आता येथील रहिवाशांना खायला उठत आहे. कधी एकदाचे आई भगवतीचे दर्शन सुरू होते, मंदिर सर्वांसाठी खुले होते आणि भाविकांची वर्दळ सुरू होते, याकडे येथील व्यावसायिकांचे डोळे लागले आहेत.ग्रामपंचायतीचा कारभार ठप्पसप्तशृंग गड ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची एक महत्त्वाची बाजू ठरणारा विषय म्हणजे प्रवेशशुल्क. गावात प्रवेश करणार्या भाविक, पर्यटक यांच्या वाहनांकडून प्रवेशशुल्क रु पात ग्रामपंचायतीला उत्पन्न सुरू झाले होते. मात्र, आता हे उत्पन्नही बंद झाले. गड ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीची मुदत संपली आहे. मात्र कोरोनामुळे निवडणूक लांबली आहे. ग्रामपंचायतीकडे निधीही नसल्याने विकासकामेही मंदावली गेली आहेत.

लॉकडाउन काळात देवस्थान ट्रस्टकडून स्थानिक गरजूंना अन्नदान सुरू होते. त्याच कालावधीत गडावर कोरोना रु ग्ण सापडल्याने हे भोजनालय बंद करण्यात आले. त्यामुळे अनेकांची उपासमार होत आहे. मात्र, आता गडावर एकही रु ग्ण नाही. ट्रस्टने भोजनालय पुन्हा सुरू करावे.- बबलू गायकवाड, व्यावसायिक, सप्तशृंग गडसप्तश्रृंग गडावर 700 हून अधिक छोटे-मोठे दुकानदार आहेत. गेल्या पाच महिन्यांत प्रत्येक दुकानदाराचे 2 ते 3 लाखांचे उत्पन्न बुडाले. आता फार अंत न पाहता शासनाने मंदिर भाविकांसाठी खुले करुन दिलासा द्यावा. अन्यथा स्थानिकांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.- रामप्रसाद बत्तासे, व्यावसायिक, सप्तश्रृंग गडकरोनाकाळात ट्रस्टने 1 मार्चपासून करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य जनजागृती अभियान सुरू केले आहे. लॉकडाउन कालावधीत 1500 ग्रामस्थांना दोन वेळचे मोफत भोजन दिले. कोणत्याही कर्मचार्याला कमी न करता त्यांच्याकडून इमारती व प्रकल्पनाची उभारणी, नूतनीकरण, देखभाल-दुरु स्ती, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, शिवालाय स्वच्छता, इतर प्रलंबित कामे करून घेतली. भक्तांनाही संस्थेच्या संकेतस्थळावर आॅनलाइन दर्शन तसेच सोशल मीडियावर दररोज दर्शन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.- सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक, देवस्थान ट्रस्ट(फोटो :12गड)

 

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या