शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शाळांमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:17 IST

शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली़ विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा, पालापाचोळा व वाळलेल्या झाडांच्या फांद्या होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला़ तसेच होळी खेळताना नैसर्गिक व कोरड्या रंगांची होळी खेळून पाण्याची नासाडी टाळली.

नाशिक : शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली़ विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा, पालापाचोळा व वाळलेल्या झाडांच्या फांद्या होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला़ तसेच होळी खेळताना नैसर्गिक व कोरड्या रंगांची होळी खेळून पाण्याची नासाडी टाळली. यावेळी पाणी बचतीचा संदेश  देण्यात आला़मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आदर्श शिशुविहार व वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर, गंगापूररोड या शाळेत होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला़ शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे व ज्येष्ठ शिक्षिका रंजना घुले यांच्या हस्ते होळीची पूजा करण्यात आली़ तनुजा वाघ यांनी होळी सणाबद्दल माहिती सांगितली़ शाळेतील संगीत शिक्षक शेवाळे व विद्यार्थ्यांनी होळी सणाची गाणी सादर केली़ शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय परिसरातील कचरा, पाला-पाचोळा, वाळलेल्या झाडांच्या फांद्या होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला व पर्यावरणाला व निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी होऊ न देता व पाणी न वापरता नैसर्गिक कोरडा रंग वापरून इको फे्रंडली होळी साजरी केली़ यावेळी निसर्गाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, अशी प्रतिज्ञा केली़सदरच्या कार्यक्रमास अनिता हांडगे, राजश्री जाधव, विशाखा पवार, शकुंतला मोगल, अक्का आहेर, वैशाली रकिबे, कविता जाधव, मनीषा घोरपडे, तनुजा वाघ, तारामती बोनाटे, ललिता शिंदे आदी शिक्षक व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते़वाल्मीकी टॉट्स शाळागंगापूर रोडवरील वाल्मीकी टॉट्स या शाळेमध्ये होळी सण आणि रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली़ यावेळी मुलांना होळी सणाची माहिती व महत्त्व सांगण्यात आले़ यावेळी पाण्याचा वापर टाळून कोरडे व नैसर्गिक रंग वापरण्यावर भर देण्यात आला़ तसेच मुलांना पाणीबचतीचा संदेश देण्यात आला़ यावेळी सिमांतिनी कोकाटे, सीमा कोकाटे उपस्थित होत्या़

टॅग्स :HoliहोळीSchoolशाळा