नाशिक : नागरिकांनी गणेशोत्सवात पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करावा, यासाठी पोलीस आयुक्तालय व जनस्थान व्हॉट्सअॅप ग्रुपने एका शॉर्ट फिल्मची निर्मिती केली आहे़ सोशल मीडियाच्या माध्यमातून ही शॉर्ट फिल्म जनसामान्यांपर्यंत पोहोचविली जाणार आहे़ या आगळ्या-वेगळ्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पोलीस आयुक्तालय व विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला असून, ही शॉर्ट फिल्म पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आली़शहरातील गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते झाडून कामाला लागले आहेत़ या गणेशोत्सवात पर्यावरणाची हानी होणाºया साहित्याचा वापर न करता पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचे आवाहन या शॉर्ट फिल्ममध्ये करण्यात आले आहे़ या शॉर्ट फिल्ममध्ये श्रीगणराय स्वत: आपल्या भक्तांना स्वागत कसे करावे हे सांगत आहेत़ तसेच प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडूमातीच्या मूर्ती वापरा. प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. त्यामुळे कागद, पुठ्ठा व शाडूमातीच्या मूर्तीचा वापर करा़ डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्य वापरा़ गुलालाऐवजी फुले वापरा, असे पर्यावरणपूरक संदेश चित्रफितीतून देण्यात आले आहेत़
शॉर्ट फि ल्ममधून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 19:09 IST