शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

इको- फ्रेन्डली गणेशोत्सव: निर्माल्य संकलनासाठी नाशकात धावणार रथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 5:45 PM

शहरात जमणारे सर्व निर्माल्य जमा करून शहर स्वच्छ ठेवणे व नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य रथ फिरवण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.

ठळक मुद्दे रोटरीचा उपक्रम : निर्धार पर्यावरण समृद्धीचा

नाशिक : निर्माल्य नदीपात्रात न टाकता थेट निर्माल्य रथात टाकावे, यासाठी गणेशोत्सव काळात निर्माल्य संकलनासाठी रोटरी एनक्लेव क्लब व महापालिका प्रशासन संयुक्त विद्यमाने ‘निर्माल्य रथ’ कार्यरत ठेवणार आहे. गणेश चतुर्थीपासून या रथाचा शुभारंभ झाला असून अनंत चतुर्दशीपर्यंत रथ कार्यान्वित राहणार असून निर्माल्याचे संकलन करणार आहे. यामुळे गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे.     उत्सव काळात गणपतीला अर्पण केलेली फुले, हार, बेल, शमी, दुर्वा, रुई, नैवेद्य इतर साहित्यांचा पसारा रस्त्यांवर पसरलेले दिसतात. तसेच या निर्माल्याचे वाहत्या पाण्यात म्हणजेच नदीत विसर्जन करण्याची पूर्वापार पद्धत आहे. देवी-देवतांना वाहिलेले निर्माल्य पवित्र समजतात. मोठ्या प्रमाणावर नदीच्या पाण्याचे प्रदूषण होत असते. त्यामुळे मनपा व रोटरीच्या काही जणांनी पुढाकार घेत गणेशोत्सवात शहरात जमणारे सर्व निर्माल्य जमा करून शहर स्वच्छ ठेवणे व नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य रथ फिरवण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. सदर रथ आजपासून ते विसर्जनापर्यंत दररोज सकाळी १० ते ५ यावेळेत सिडको येथून सुरुवात करणार आहे. तरी या उपक्रमास शहरातील सर्वच नागरिकांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन रोटरीचे प्रांतपाल राजेंद्र भामरे, अध्यक्ष गुरमित सिंग रावल, मनपा आरोग्य विभागाचे डॉ. बुकाने, डॉ. सचिन हिरे यांनी केले आहे.गणेशोत्सव काळात घरोघरी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होत असते. त्यात हे निर्माल्य नागरिकांकडून नदीच्या पाण्यात टाकले जाते. त्यामुळे नदीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असते. तसेच काही जण हे निर्माल्य गोदाघाटपरिसरात आणून टाकत असतात. त्यामुळे आम्ही ‘निर्माल्य रथ’ ही नवीन संकल्पना राबवित आहोत. यासाठी मनपाचे आम्हाला मोठे सहकार्य लाभले आहे. सुरुवातील एक निर्माल्य रथ शहरात फिरवला जाणार असून, गरज पडल्यास यामध्ये वाढ करणार आहोत.- गुरमित सिंग रावल, अध्यक्ष, रोटरी एनक्लेव क्लब

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाgodavariगोदावरीGanesh Mahotsavगणेश महोत्सव