शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

देवळा तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळाच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 18:42 IST

चणकापूर धरणाचे पाणी झाडी-एरंडगाव धरणात कधी पडेल असा संतप्त सवाल देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता करीत असून, सद्यस्थितीत या भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने कशातरी पेरण्या पूर्ण केल्या आहेत; परंतु पेरणीनंतर पाऊसच झाला नसल्याने खरीप पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी भटकंती चणकापूरचे पूरपाणी कधी मिळणार? जनतेचा सवाल

उमराणे : जिव्हाळ्याचा परंतु गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला चणकापूर झाडी एरंडगाव कालवा कधी पूर्ण होईल व चणकापूर धरणाचे पाणी झाडी-एरंडगाव धरणात कधी पडेल असा संतप्त सवाल देवळा तालुक्याच्या पूर्व भागातील जनता करीत असून, सद्यस्थितीत या भागात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने कशातरी पेरण्या पूर्ण केल्या आहेत; परंतु पेरणीनंतर पाऊसच झाला नसल्याने खरीप पिकांचे नुकसान होत आहे.चणकापूर ते झाडी एरंडगाव उजवा कालवा गेल्या अनेक वर्षांपासून टप्प्याटप्प्याने पंचवार्षिक निवडणुकींच्या माध्यमातून हळूहळू पुढे सरकत आला आहे. खडतर प्रवासातून हळूहळू मार्गक्र मण करणाऱ्या पुनद प्रकल्पांतर्गत चणकापूर ते झाडी एरंडगाव या ३६ कि.मी.अंतराच्या कालव्याचा इतिहासात बघता जिल्ह्यातील कळवण, देवळा, मालेगाव आदी दुष्काळी भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सर्वप्रथम या उजव्या कालव्याला मंजुरी मिळाली होती. या कालव्यांतर्गत दुष्काळी भागात दोन लघु पाटबंधारे, २३ पाझर तलाव, ११ को.पा. बंधारे त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्के भरण्यासाठी चणकापूर धरणातून पूरपाणी देणे नियोजित आहे. त्या अनुषंगाने २००८ साली या धरणातून पूरपाणी प्रवाहित करून रामेश्वर धरणापर्यंत पाणी पोहोचले होते. तेथून पुढील चारीचे काम पुढे सरकत असताना दहीवड जवळील १३ ते १५ कि.मी.अंतरात भुयारी बोगदा असल्याने व त्यातच ही जमीन वनविभागाची असल्याने त्याची रितसर परवानगी व शासकीय निधीअभावी हा कालवा बरीच वर्ष रखडून पडला होता. आजमितीस हा कालवा दहिवडपर्यंत येऊन पाहोेचला असून, तेथून पुढील १६ ते २८ कि.मी. मधील काम वेगवेगळ्या ठेकेदारांकडून केले गेले असल्याने काही ठेकेदारांनी काम पूर्ण केले तर काहींचे काम अपूर्णच आहे. कालव्याचे काम पूर्ण होऊन पाणी मिळावे यासाठी मागील वर्षी देवळा तालुका पूर्वभाग कृती समितीतर्फे देवळा येथे रास्ता रोको आंदोलन छेडून पिंपळगाव (वा.), खुंटेवाडी, वाखारी, मेशी, दहीवड, खडकतळे, खारीपाडा, डोंगरगाव, उमराणे, चिंचवे, सांगवी, कुंभार्डे, गिरणारे, झाडी, तिसगाव, वºहाळे, सावकारवाडी, एरंडगाव आदी गावातील जनतेकडून तहसील कार्यालयासमोर चक्र ी पद्धतीने साखळी उपोषण करण्यात आले होते; परंतु शासनाने याची फारशी दखल न घेता या उपोषणाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे सध्यातरी या कालवा पूर्णत्वाचे स्वप्न अंधारातच आहे. 

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक