शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के, आदिवासी भयभीत, रात्र काढताहेत जागून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 21:42 IST

कळवण (नाशिक)- दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे आदी दळवट परिसरातील भागात शनिवारी रात्री व आज रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधव  भयभीत झाले

कळवण (नाशिक)- दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे आदी दळवट परिसरातील भागात शनिवारी रात्री व आज रविवारी भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधव  भयभीत झाले असून भूकंपाच्या धसक्याने आदिवासी रात्र जागून काढत आहे. आज सकाळी भूकंपाचा बसलेला हा धक्का किती रिश्टर स्केलचा असेल हे समजू शकले नाही. सौम्य धक्के बसल्याने घरातील भांडे पडली, घरांवरील पत्रे हादरली. त्यामुळे परिसरातील लोकांमधे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  दळवट हे तालुक्यातील भूकंपाचे केंद्रबिंदू असून याठिकाणी भूकंपमापक यंत्र बसविले देखील होते मात्र आज या ठिकाणी भूकंप मापक यंत्र अथवा धोक्याची सूचना देणारा सायरन नसल्याचे शासकीय यंत्रणेचे या परिसराकडे दुर्लक्ष आहे.आज सकाळी मेरी येथे संपर्क साधला असता आज 11 वाजेपर्यंत येथील भूकंप मापक यंत्रावर नोंद नसल्याचे चारुलता चौधरी यांनी सांगितले तर भूकंपाबाबत तहसीलदार कैलास चावडे यांनी सौम्य धक्के बसले असून कुठेही मालमत्तेची अथवा जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले. दरम्यान महसूल आणि पोलीस यंत्रणेने दळवट परिसरात भेटी देऊन आदीवासी बांधवांशी चर्चा करून दिलासा दिला.रविवारी रात्री देखील परिसरात भूकंपाचे धक्के  जाणवले मात्र रात्र असल्याने फारसे लक्षात आले नाही. सकाळी जेव्हा 10 वाजून 20 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले, त्यावेळी घरातील भांडी, पत्र्यांना व घरांना हादरे जाणवले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दळवटचे सरपंच रमेश पवार, लक्ष्मण पवार, यशवंत पवार यांनी सांगितले. भूकंपाच्या ह्या जोराच्या धक्क्यामुळे आदिवासी बांधव भयभयीत झाले असून कुठलेही नुकसान झाले नसल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले.दळवट व परिसर आदिवासी असून सन 1995 पासून भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने या भागातील आदिवासी भागाकडे व जनतेकडे शासनाचे लक्ष केंद्रित करून विविध सुविधा पुरवाव्यात अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकEarthquakeभूकंप