शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

स्काउट-गाइड मेळाव्यात  आठ पुरस्कारांची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:19 IST

तालुक्यातील वडांगळी येथील मविप्रच्या न्यू इंग्लिश स्कूलने स्काउट-गाइड जिल्हा मेळाव्यात विविध प्रकारांत सहभाग घेत आठ पुरस्कारांची कमाई करत आपला दबदबा कायम ठेवला.

सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील मविप्रच्या न्यू इंग्लिश स्कूलने स्काउट-गाइड जिल्हा मेळाव्यात विविध प्रकारांत सहभाग घेत आठ पुरस्कारांची कमाई करत आपला दबदबा कायम ठेवला.  मेळाव्यात पार पडलेल्या सर्वच स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घेऊन उपस्थितांचे लक्ष वेधले. स्काउट पथकाने शोभायात्रा प्रकारात सादर केलेल्या ‘कुरुक्षेत्रातील पांडवांचा विजयरथ’ या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला. तंबू सजावट व पायोनियरिंग प्रकारातील ‘नदीवरील पूल’ याला द्वितीय क्रमांक मिळाला. तर प्रवेशद्वार सजावट व शारीरिक कसरत या दोन्ही प्रकारात विद्यालयाला तृतीय क्रमांक मिळाला.  गाइड पथकाने ‘दरीवरील पूल’ या पायोनियरिंग प्रकारात प्रथम क्रमांक तर ‘तंबू सजावट व प्रवेशद्वार सजावट’ प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला.  संघनायक ऋषी पांडे व उपसंघनायक आदित्य काळे, संघनायिका पायल वाघमारे व उपसंघनायिका पल्लवी चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले.  कला शिक्षक काकासाहेब तांबे, सतीश टिळे, संगीत शिक्षक सचिन सानप, सांस्कृतिक विभागप्रमुख राजेंद्र भावसार यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मविप्रच्या सरचिटणीस व स्काउट-गाइडच्या जिल्हाध्यक्ष नीलिमाताई पवार, संचालक हेमंत वाजे, माजी संचालक कृष्णाजी भगत यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक यांचा गौरव शालेय समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, आर. जे. थोरात, रंगनाथ खुळे, प्राचार्य शरद रत्नाकर यांच्या हस्ते करण्यात आला.८० शाळेतील दीडहजार विद्यार्थ्यांचा सहभागपिंपळगाव बसवंत येथील भीमाशंकर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रांगणात नुकताच चार दिवसीय मेळावा उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील ८० पेक्षा अधिक विद्यालयांचे सुमारे १ हजार ७०० विद्यार्थी यात सहभागी झाले. वडांगळी विद्यालयाचे २२ स्काउटर्स व १७ गाइड्स, शिक्षक देवराम खेताडे, आशालता पाटील, माधुरी रोहम, संदीप पडवळ, राजेश कराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्यात सहभागी झाले.

टॅग्स :Schoolशाळा