शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाची जमीन दाखवून कोट्यवधींची कमाई; नाशिकमध्ये तीघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 17:50 IST

या पाच संशयितांनी २०१३ साली जळगावमध्ये प्रॉपर्टी मेळावा घेतला. या मेळाव्यात प्लॉटसाठी बहुसंख्य नागरिकांकडून आगाऊ नोंदणी करून घेतली. त्यानंतर कॅनडा कॉर्नर येथील पाटील प्लाझा या संकुलात मोरया कन्स्ट्रूवेल प्रा. लि. नावाने कार्यालय उघडले.

ठळक मुद्दे या पाच संशयितांनी २०१३ साली जळगावमध्ये प्रॉपर्टी मेळावा घेतला.पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले

नाशिक : कोपरगावच्या काकडी विमानतळाजवळ प्लॉट देण्याचे आमिष दाखवून आगाऊ बुकिंग करत भामट्यांनी जळगावला प्रॉपर्टी मेळा भरविला आणि राज्य शासनाने विमानतळासाठी हस्तांतरित केलेल्या जमिनीवर कोट्यवधींची कमाई करून सुमारे आठशे नागरिकांची आगाऊ नोंदणी प्लॉटधारक म्हणून केली. तसेच आठ तक्रारदारांची २३ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जळगाव जिल्ह्यातील यशवंत कॉलनीमधील सेवानिवृत्त बॅँक कर्मचारी सुरेश खंडेराव पाटील (६६) यांनी नाशिकमधील कामटवाडे व सिडको परिसरातील रहिवासी असलेले संशयित सुनील मारुती ढोली, जितेंद्र अशोक जगताप, योगेश सुभाष विश्वंभर, किरीट दगडू सद्गीर व दगडू पाटील या पाच व्यक्तींविरुद्ध फिर्याद सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. या पाच संशयितांनी २०१३ साली जळगावमध्ये प्रॉपर्टी मेळावा घेतला. या मेळाव्यात प्लॉटसाठी बहुसंख्य नागरिकांकडून आगाऊ नोंदणी करून घेतली. त्यानंतर कॅनडा कॉर्नर येथील पाटील प्लाझा या संकुलात मोरया कन्स्ट्रूवेल प्रा. लि. नावाने कार्यालय उघडले आणि काकडी शिवारात भविष्यात विमानतळ होणार असून जागेला मोठा भाव मिळणार असल्याचे सांगून शासनाची जमीन दाखवून सदर जागेवर भूखंड पाडले जातील, असे सांगून स्वस्त रकमेचे आमिष दाखविले. यानंतर प्रत्येकाकडून ५०० ते १००० रुपये नोंदणीच्या नावाखाली गोळा केले. सध्या आठ तक्रारदार पोलिसांपर्यंत पोहचले असून, त्यांनी एकूण २३ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.असा जिंकला विश्वासशासनाने काकडीच्या विमानतळासाठी हस्तांतरित केलेली जमीन दाखवून प्लॉट घेण्यासाठी इच्छुक असलेल्या सुमारे ७९९ नागरिकांचा विश्वास संपादन केला. मोरया कन्स्ट्रूवेल कंपनीच्या पाच भामट्यांनी गैरप्रकार केला. अवैधरीत्या नागरिकांकडून पैसा जमा करून घेत त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. प्रारंभी सात ते आठ तक्रारदारांची फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे.वेळोवेळी उकळले पैसेया पाच भामट्यांनी बनावट कंपनीच्या नावाने एका खासगी बॅँकेत खाते उघडले. प्लॉटधारक म्हणून नोंदणी केलेल्या नागरिकांकडून वेळोवेळी एक लाख ते पाच लाखांपर्यंत पैसे उकळले आणि जमा झालेली रक्कम बॅँक खात्यात भरली. प्लॉट एनए झाल्यानंतर विक्री करणार असल्याचे सांगून ७९९ प्लॉटधारकांची नोंदणी क रून घेतली आहे.

 

टॅग्स :Policeपोलिसnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक