चांदवड : तालुक्यातील सोनीसांगवी येथे विहिरीत आडवे बोअर सुरू असताना तोल जाऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. भास्कर कचरू ठाकरे यांच्या विहिरीचे आडव्या बोअरचे काम सुरू होते. यावेळी मोठाभाऊ पोपट कोल्हे (२९), रा. विटावे याचा तोल जाऊन पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची खबर पोलीसपाटील रमाकांत फकिरा ठाकरे यांनी चांदवड पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. एस. मार्तंड व कर्मचारी घटनास्थळी गेले व पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (वार्ताहर)
विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू
By admin | Updated: March 20, 2016 22:28 IST