शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दारणाच्या डोहात बुडून इसमाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 14:22 IST

घोटी : वाघेरे ता. इगतपुरी येथे दारणा नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

घोटी : वाघेरे ता. इगतपुरी येथे दारणा नदी पात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या बुडालेल्या इसमाला तब्बल २४ तासानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. हट्टीपाडा येथील वाळू भाऊ वारे, (40) हे मजुरी निमित्ताने मुंढेगाव येथील खडी क्रशर वर कामासाठी आले होते, सुट्टी असल्याने जवळच दारणानदी पात्रात आपल्या कुटुंबासह मासेमारी करण्यासाठी वाघेरे येथील दारणेच्या पात्रात सकाळी अकरा वाजता गेले होते. पाण्याच्या मध्यभागी पोहताना अचानक पाण्यात बुडू लागले मात्र परिसरात वाचवण्यासाठी कोणीही उपस्थित नसल्याने कुटूंबाची धावाधाव व्यर्थ ठरली. मुंढेगाव येथील पोलीस पाटील गणपत जाधव, सरपंच संगीता हंबीर यांनी तत्काळ घोटी पोलीसांना घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी घटनास्थळी पथक पाठवले. यावेळी घटनास्थळी धाव घेत पोलीस हवालदार सुहास गोसावी यांनी पट्टीच्या पोहणाऱ्यांना सोबत घेत नदी पात्रात शोध कार्य सुरू ठेवले. जवळपास सात तास शोध कार्य सुरू ठेवण्यात आले, मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. दरम्यान आज सकाळी पुन्हा शोध मोहीम राबविल्याने या इसमाचा मृतदेह हाती लागला.

टॅग्स :Nashikनाशिक