शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
7
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
8
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
9
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
10
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
11
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
12
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
13
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
14
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
15
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
16
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
17
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
18
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
19
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
20
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

इगतपुरी तालुक्यात बिबट्या मृतावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 13:01 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील ओंडली या गावाच्या हद्दीत मंगळवारी सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळुन आला. ओंडली शिवारात जवळच बैल चारत असताना गणेश हंबरे या शेतकऱ्याला भाताच्या खाचरात मृत अवस्थेत असलेला बिबटया दिसून आला. याबाबतची माहिती त्याने गावचे पोलीस पाटील यांना दिली.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील ओंडली या गावाच्या हद्दीत मंगळवारी सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळुन आला. ओंडली शिवारात जवळच बैल चारत असताना गणेश हंबरे या शेतकऱ्याला भाताच्या खाचरात मृत अवस्थेत असलेला बिबटया दिसून आला. याबाबतची माहिती त्याने गावचे पोलीस पाटील यांना दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन मृत बिबट्याचा पंचनामा केला.सदर बिबट्या हा नर जातीचा असून चार पाच दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. प्रारंभी गणेश याला बिबट्या भाताच्या वावरात झोपलेला दिसला. म्हणून त्याने आरडाओरडा करून आसपासच्या लोकांना बोलावले. सर्वच नागरिक घाबरलेले होते. दबक्या आवाजात त्यांनी बिबट्याला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. पण बिबट्या प्रतिसाद देत नसल्याने छोटे दगड फिरकावून बघितले तरीही बिबट्याची काहीही हालचाल करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर जवळ जाऊन पाहिले असता तो मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले. बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी इगतपुरी येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी येथील घाटनदेवी अभ्यारण्यात घेऊन गेले आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी,वन परिमंडळ अधिकारी, वनपाल आदी करत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक