शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

केवळ बसेस ‘स्टार्ट’ करण्यासाठीच ड्युटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 01:42 IST

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रकारची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस डेपो आणि वर्कशॉपमध्ये उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. या बसेस सध्या मागार्वर धावत नसल्या तरी गाड्या बंद ठेवून त्यात बिघाड होऊ नये यासाठी फक्त बसेस सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे.

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रकारची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस डेपो आणि वर्कशॉपमध्ये उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. या बसेस सध्या मागार्वर धावत नसल्या तरी गाड्या बंद ठेवून त्यात बिघाड होऊ नये यासाठी फक्त बसेस सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे.कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क झालेल्या शासकीय यंत्रणेपैकी राज्य प परिवहन महामंडळ हे एक असून, महामंडळाने सर्वप्रथम प्रवासी वाहतूक बंद करून कोरोना रोखण्यासाठीचे पाऊल उचलले. प्रवासातून कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने बसेसमध्ये सोशल डिस्टन्सिंग सर्वप्रथम राबविण्यात आले होते. प्रवाशांच्या हाताला सानिटाइझर लावण्याचा प्रयोगदेखील महामंडळाने राबविला. कारोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाल्यानंतर राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार केवळ पाच टक्के कर्मचारी कामावर ठेवण्यात येत असल्याने परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांनादेखील तसे नियोजन करावे लागले. त्यामुळे कमी कर्मचारी देखभाल दुरुस्तीच्या कामावर आहेत.सध्या कोण्यातही प्रकारच्या बसेस सुरू नसल्याने चालक-वाहकांना रजा देण्यात आलेली आहे. परंतु काही तांत्रिक कामगारांना उभ्या असलेल्या बसेस केवळ सुरू करून बॅटरी आणि इंजिन चार्ज करण्यासाठीची ड्युटी देण्यात आली आहे. त्यानुसार काही कर्मचारी सध्या केवळ उभ्या असलेल्या बसेस सुरू करण्यासाठी कामावर येत आहेत. साधारपणे पंधरा ते वीस मिनिटे बस सुरूच ठेवली जाते. जेणे करून बसची बॅटरी चार्ज राहील तसेच इंजिनदेखील कोरेडे पडणार नाही यासाठी सध्या जागेवरच बसेस सुरू केलय जात आहेत. काही बसेस धुतल्याही जात आहेत.महामंडळाचे पेठरोड येथेही वर्कशॉप आहे. तेथे काही बसेस उभ्या करण्यात आलेल्या आहेत.परंतु कर्मचारी कामावर बोलविण्याला मर्यादा असल्याने वर्कशॉपमधील दुरुस्तीची कामेदेखील काही प्रमाणात बंद आहेत. किरकोळ स्वरूपातील कामे होत असली तरी ती कर्मचारी संख्या पुरेशी नसल्याने दुरुस्तीची मूळ कामेदेखील पूर्ण क्षमतेने होताना दिसत नाही.

टॅग्स :Nashikनाशिक